Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासुरत-चेन्नई महामार्ग क्रॉसिंगवर ईनलेट-आऊटलेट द्या; आमदार कोकाटेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे मागणी

सुरत-चेन्नई महामार्ग क्रॉसिंगवर ईनलेट-आऊटलेट द्या; आमदार कोकाटेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे मागणी

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

सुरत-चेन्नई महामार्ग हा सिन्नर-शिर्डी महामार्गाला (Sinnar-Shirdi highway) छेदून जातो. त्या ठिकाणी क्रॉसिंगसाठी इनलेट व आऊटलेटची सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवालात बदल करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांना पत्र पाठवत केली आहे…

- Advertisement -

सिन्नर तालुक्यातून सुरत-चेन्नई महामार्ग (Surat-Chennai Highway) मंजूर असल्याचे सर्वश्रुत आहे. याच रस्त्याबाबत काही लोकाभिमुख बदल होण्याची आवश्यकता असल्याने त्याबाबत आ. कोकाटे यांनी ना. गडकरी यांना याबाबत साकडे घातले आहे. रस्त्यापासून ओझर व शिर्डी (Ozar and Shirdi) हे दोन्ही विमानतळजवळ आहेत. त्यामुळे सुरत चेन्नई महामार्गास सिन्नर-शिर्डी महामार्गावर इनलेट आउटलेट असल्यास दोन्ही विमानतळांवरून येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय दूर होऊ शकेल. तसेच तालुक्यात मुसळगाव व माळेगाव येथे दोन औद्योगिक वसाहती असून त्यात काही मोठे उद्योग आहेत. त्याचप्रमाणे सिन्नर-शिर्डी महामार्गावर मुसळगाव येथे रतन इंडिया कंपनीचा थर्मल पॉवर प्रोजेक्ट असून लगत जवळपास १ हजार हेक्टर जागा औद्योगिक वसाहतीसाठी प्रत्यक्षात संपादित झालेली आहे.

भविष्यात टर्मिनल मार्केट राहणार उभे

शिर्डी, ओझर विमानतळांच्या वापरासाठी कनेक्टिव्हिटी सुरत-चेन्नई महामार्ग हा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला (Nagpur-Mumbai Samriddhi Highway) छेदून जात असल्याने दोन्ही महामार्गांच्या दरम्यान मोठे इंटरनॅशनल टर्मिनल मार्केट भविष्यात उभे राहू शकते. त्याद्वारे औद्योगिक वसाहतीत उत्पादित होणारा माल तसेच शेतमाल दोन्ही महामार्गांद्वारे व लगत असलेल्या शिर्डी व ओझर विमानतळांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविण्यासाठी दोन्ही महामार्गांचा वापर होऊ शकतो. त्यामुळे क्रॉसिंगसाठी इनलेट व आउटलेटची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी आमदार कोकाटे यांनी पत्रात केली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या