Friday, April 26, 2024
Homeधुळे70 लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य एकूण 14 लाख रुपये मंजूर

70 लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य एकूण 14 लाख रुपये मंजूर

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत धुळे तालुक्यातील तब्बल 70 लाभार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये याप्रमाणे एकूण 14 लाख रुपयांची आर्थिक मदत लाभार्थींच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात आलेली आहे. लॉकडाऊनच्या काळात ही मदत मिळाल्याने लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

संजय गांधी निराधार योजनेतंर्गत धुळे तालुक्यातील असंख्य लाभार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित होती. तहसीलदार धुळे यांना वारंवार सूचना करून आ. कुणाल पाटील यांनी त्यावेळी विविध योजनेतील प्रकरणे मार्गी लावली होती.

मात्र करोनाच्या संकटात टाळेबंदीमुळे संबंधित लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळण्यास उशीर होत होता म्हणून संजय गांधी निराधार योजनेतंर्गत प्रलंबित अर्थसहाय्य तातडीने मिळावे याकरिता आ. कुणाल पाटील यांनी पाठपुरावा करून लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळवून दिले आहे.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत दारिद्रय रेषेखालील त्यांच्या वारसास वीस हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते.

त्या अनुषंगाने धुळे तालुक्यातील एकूण 70 लाभार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार याप्रमाणे एकूण 14 लाख रुपयाचे अर्थसहाय्य आ. कुणाल पाटील यांच्या सूचनेवरून तातडीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.

करोनामुळे टाळेबंदीच्या आर्थिक संकटात सापडलेल्या लाभार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून आ. कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या