इगतपुरी-त्र्यंबकसाठी आ. खोसकरांनी दिला एक कोटीचा निधी

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । Nashik

इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांची करोना चाचणी पाॅजीटीव्ह आल्या कारणाने होम क्वारंटाईन आहेत. मात्र,करोना महामारीवर मात करण्यासाठी दोन्ही तालुक्यातील कोविड रुग्णांना जास्तीत जास्त सुविधा मिळावी म्हणुन आ. खोसकर यांनी आमदार स्थानिक विकास निधितुन कोविड रुग्णांसाठी व आरोग्य विषयक सुविधा मिळाव्या, यासाठी रुग्णांना लागणाऱ्या आवश्यक साहित्य/सामुग्रीसाठी एक कोटीचा निधी दिला आहे.

या निधीतुन रुग्णवाहीका, ऑक्सिजनसाठी लागणारे बेड, मेडिसिन, सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य खरेदीसाठी हा निधी खर्च करण्यात येत असुन यामुळे तुर्तास येणाऱ्या अडचणीसाठी मोठी मदत होणार आहे.

तसेच इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी काही नविन कोविड सेंटर व व्हेंटिलेटर बेड लवकरात लवकर सुरू करणे, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, घोटी, हरसुल येथील ग्रामीण रुग्णालयासाठी चार रुग्णवाहीका मिळाव्यात, याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ, आदिवासी विकासमंत्री, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातुन आमदार हिरामण खोसकर यांनी साकडे घालुन शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व साखळी तोडणे आवश्यक असल्याने काही कडक निर्बंध लागु करण्यात आलेले आहेत ते नागरिकांनी पाळावे, विनाकारण घराबाहेर पडु नका, आरोग्य विभाग व पोलिस प्रशासन यांना सहकार्य करा,

लाॅकडाऊनमुळे आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागत असुन नुकसानही होईल. मात्र शासनाने दिलेल्या सुचनांचे/नियमांचे पालन करणे आरोग्याचे दृष्टिने गरजेचे असुन कायद्याचे पालन करावे,असे आवाहन आमदार हिरामण खोसकर यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *