Friday, April 26, 2024
Homeनाशिक... तर टोल बंद करणार - छगन भुजबळ

… तर टोल बंद करणार – छगन भुजबळ

नाशिक | Nashik

३१ ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची (Nashik-Mumbai Highway) सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद (Toll off) करण्याचा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या (National Highway Authority of India)अधिकाऱ्यांना देत लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका असा सज्जड दम दिला….

- Advertisement -

छगन भुजबळ यांनी आज नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते वडपे दरम्यान मुंबई महामार्गावरील रस्त्याची (Road) पाहणी करून अधिकाऱ्यांची कानउघडणी करत फैलावर घेतले. यावेळी नॅशनल हायवेचे प्रकल्प अधिकारी साळुंखे, गोंदे ते पडघा टोलवेज पीक इंफ्रा कंपनीचे संचालक आनंद सिंग, माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई-आग्रा रस्त्यावर (Mumbai-Agra Road) मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अनेकांना अपघातात (Accident) आपला प्राण गमवावा लागला. याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच नॅशनल हायवे यांना पत्र व्यवहार केला आहे. मात्र अद्यापही रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे असल्याने आज भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते इगतपुरी दरम्यान रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत रस्त्यांवरील खड्डे (Pits)न बुजविल्यास १ नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या