Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात भाजपला २०२४ मध्ये सुरुंग? ‘त्या’ अहवालाबद्दल विनोद तावडेंचं सूचक ट्वीट

राज्यात भाजपला २०२४ मध्ये सुरुंग? ‘त्या’ अहवालाबद्दल विनोद तावडेंचं सूचक ट्वीट

मुंबई | Mumbai

राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा कालपासून सुरु होत्या. मात्र अजित पवारांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.

- Advertisement -

दरम्यान या सर्व घडामोडींमध्ये भाजप नेते विनोद तावडेंच्या नावाचीही चर्चा होती. २०२४ मध्ये भाजपच्या जागा घटणार असल्याचा अहवाल भाजप नेते विनोद तावडे यांच्या समितीने केंद्रीय नेतृत्वाला दिल्याचं सांगितलं जात आहे. या अहवालामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या सर्व प्रकरणावर विनोद तावडे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये विनोद तावडे म्हणाले, “दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे.”

मुलाचा एन्काउंटर, बापाची खुलेआम हत्या! ४४ वर्षात उभारलेले अतिक अहमदचे साम्राज्य ५१ दिवसांत उद्धवस्त
Apple ची भारतात धमाकेदार एन्ट्री, मुंबईत उघडलं पहिलं स्टोअर… खासियत जाणून आवक् व्हाल

विनोद तावडे यांच्या समितीच्या कथित अहवालात काय?

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार असा अहवाल समोर आला आहे. भाजप नेते विनोद तावडे यांच्या समितीने हा अहवाल दिला. २०१९ च्या तुलनेत यावेळी भाजपच्या जागा घटणार. भाजपला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात फटका बसणार, असाही उल्लेख विनोद तावडे यांच्या समितीच्या अहवालात करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या