Wednesday, April 24, 2024
Homeजळगावखेळता खेळता हरविलेला 3 वर्षांचा बालक पोलिसांच्या सतर्कतेने सुखरुप सापडला

खेळता खेळता हरविलेला 3 वर्षांचा बालक पोलिसांच्या सतर्कतेने सुखरुप सापडला

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील अयोध्यानगर येथील राहत्या घरुन आज मंगळवारी दुपारी खेळता खेळता हरविलेला 3 वर्षाचा बालक हरविला होता.

- Advertisement -

हा बालक अजिंठा चौफुलीवर पोहचला होता. शहर वाहतूक शाखा व एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍याच्या सतर्कतेने सापडलेल्या बालकाला सुखरुप सायंकाळी त्याच्या आई वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. पूर्व सागर मुंदडा वय 3 वर्ष असे या बालकाचे नाव आहे.

अयोध्यानगर परिसरात सागर मुंदडा हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचा तीन वर्षाचा मुलगा पूर्व आज मंगळवारी दुपारी घराबाहेर खेळता खेळता हरविला. हरविल्यानंतर हा मुलगा थेट चालत चालत अजिंठा चौफुली परिसरात पोहचला.

अजिंठा चौकात रडत असलेल्या बालकाकडे एका नागरिकाचे लक्ष गेले. त्याने पूर्व यास चौकात उभ्या शहर वाहतूक पोलीस कर्मचार्‍याच्या स्वाधीन केले. शहर वाहतूक शाखेने पोलीस कंट्रोल रुमला संबंधित मुलाबाबत माहिती दिली.

तसेच मुलाला सोबत घेत एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे गोविंदा पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांनी पूर्व याच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हरविलेल्या मुलाचा शोध घेत पूर्व याचे आई राधिका व वडील सागर मुंदडा हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहचले.

मूलगा पूर्व यास सुखरुप पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला. पूर्व सुखरुप मिळून आल्याने त्याच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या