Friday, April 26, 2024
Homeनाशिकदिंडोरी : राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानात अल्पसंख्याक सेल जिल्ह्यात अव्वल

दिंडोरी : राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानात अल्पसंख्याक सेल जिल्ह्यात अव्वल

दिंडोरी । Dindori (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानात नाशिक जिल्ह्यातील अल्पसंख्याक सेलने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्याने सर्वाधिक 2500 अभिप्राय नोंदवल्याने जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष तौसिफ मणियार यांनी सन्मानचिन्ह स्वीकारत पुरस्कार स्वीकारला.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, हाजी गफ्फार मलिक, फौजिया खान आदी मान्यवर उपस्थित होते.

अल्पसंख्याक सेलला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, राष्ट्वादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील, गणपत पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब जाधव, संजय पडोळ, विलास कड, अनिल देशमुख, भास्कर भगरे, राजाराम ढगे, विश्वासराव देशमुख, नरेश देशमुख, डॉ. योगेश गोसावी, श्याम हिरे, मुख्तार शेख, अस्करीबेग मिर्झा, रऊफ शेख, आरिफ शेख, सादीक शेख, मोसिन शेख आदींसह लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या