Friday, April 26, 2024
Homeनगरकोळगाव ग्रामीण रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे मंत्री टोपे यांचे आदेश

कोळगाव ग्रामीण रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे मंत्री टोपे यांचे आदेश

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील कोळगाव येथील मागील 3 वर्षांपासून रखडलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी

- Advertisement -

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची सामाजिक कार्यकर्ते सुधीर सयाजीराव लगड व दादासाहेब लगड यांनी भेट घेऊन लक्ष वेधले असता ना. टोपे यांनी प्रशासकीय मान्यता तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी मार्च 2021 पर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

तालुक्यातील कोळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला परवानगी मिळाल्यानंतर 28 मे 2018 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे पाठविलेल्या इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखड्यानुसार 21 जानेवारी 2021 रोजी अंदाजपत्रकानुसार निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. मात्र मार्च 2021 रोजी आलेल्या करोना या जागतिक महामारीमुळे निधी उपलब्ध झाला नसल्याने रुग्णालयाच्या इमारतीचे काम रखडले होते.

मागील 3 वर्षांपासून रखडलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची कोळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीर सयाजीराव लगड व दादासाहेब लगड यांनी 2 फेब्रुवारी रोजी भेट घेरून लक्ष वेधले असता ना. टोपे यांनी संबंधित विभागाला प्रशासकीय मान्यता तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी मार्च 2021 पर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिल्याने कोळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागल्याचे सुधीर लगड यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या