Wednesday, April 24, 2024
Homeनगरना. गडाखांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ना. गडाखांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

ना. शंकरराव गडाख हे तालुक्याच्या विविध गावात सांत्वन भेटी, छोटेखानी कार्यक्रम, कोविड सेंटर अशा विविध ठिकाणी भेटी देत आहे.

- Advertisement -

जलसंधारण मंत्री गडाख सोशल डिस्टन्स पाळत नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांच्या विरोधकांनी केली आहे.

विधानसभेच्या मोठ्या यशानंतर शंकरराव गडाख यांची राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपला साधेपणा जपत मंत्रिपदाची कुठलीही हवा डोक्यात जाऊ न देता काम चालू केले. तसे जवळच्या कार्यकर्त्यांनासुद्धा कानमंत्र दिला. सत्ता येते जाते पण जनसामान्यांची नाळ तोडू नका.

मार्च महिन्यापासून लॉकडाउन लागला. त्यानंतर करोनाचे रुग्ण वाढल्यामुळे उपाययोजनेच्या बैठका घेण्यात आल्या. तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवत त्यांना नामदार गडाख यांनी सूचना केल्या.

मागील महिन्यात त्यांनी नेवासा फाटा व शिंगणापूर येथील कोविड सेंटरला भेट देत थेट रुग्णांशी सुरक्षित अंतर ठेवून सवांद साधला व त्यांना काय काय अडचण येते याची माहिती घेऊन प्रश्न सोडविले. तालुक्यात गडाखांचा संपर्काचा धडाका पाहून त्यांच्या विरोधकानीं सोशल डिस्टन्स पाळत नाही म्हणून नामदार गडाखांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

मंत्री गडाख यांचा पाथरवाला, नजीक चिंचोली, नेवासा शहर, प्रवरासंगम, चिलेखनवाडी, गेवराई अशा विविध ठिकाणी बैठकीचा धडाका लावला आहे. खुर्चीवर न बसता लोकांत सतरंजीवर बसून ते बैठका घेत आहे. गडाख समर्थक या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर पसरवत आहे तर विरोधक सोशल डिस्टन्स पळत नाही म्हणून गडाखांवर कारवाईची मागणी करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या