Saturday, April 27, 2024
Homeनगरचंद्रकांत पाटलांविरोधात संघटना आक्रमक

चंद्रकांत पाटलांविरोधात संघटना आक्रमक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद शनिवारी शहरात उमटले. संघटनांनी त्यांच्या निषेधात आक्रमक भुमिका घेतली. राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट, समता परिषद, फुले ब्रिगेडसह अन्य पुरोगामी संघटनांनी पाटील यांचा निषेध केला आहे.

- Advertisement -

गडकरींच्या आश्वासनानंतर निलेश लंकेंचे उपोषण मागे

‘भाजपाच्या वाचाळवीरांना शिवसेना स्टाईलने उत्तर’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या काही दिवसापासून भाजपाच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचे मोठे षढयंत्र सुरु केले असल्याचेच दिसून येत आहे. ज्या राष्ट्र पुरुषांनी महाराष्ट्र घडविला, त्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करुन चुकीचा इतिहास लोकांसमोर मांडण्याचे उद्योग सुरु आहेत. भाजपाचे राज्यपाल, मंत्री, प्रवक्ते यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याची जणु सुपारीच घेतली आहे का? अशी शंका निर्माण होत आहे.

दहशत व सुडाचे राजकारण

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्र पुरुषांबाबत केलेले वक्तव्य हा त्यांच्या त्यागाचा अपमान आहे. या राष्ट्र पुरुषांची जनसामान्यातील प्रतिमा मलिन करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. भाजपाचा हा डाव शिवसेना कदापी यशस्वी होऊ देणार नाही, त्यांना शिवसेना स्टाईलनेच उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिली. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्र पुरुषांबद्दल केलेल्या बेताल व्यक्तव्याचा शहर शिवसेनेच्यावतीने माळीवाडा येथे मंत्री पाटील यांच्या प्रतिमेवर चिल्लर फेकून आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधीपक्ष नेता संजय शेंडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, स्मीता अष्टेकर, गणेश कवडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, दत्ता कावरे, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, रवि वाकळे, संदिप दातरंगे, विठ्ठल जाधव, अरुण झेंडे, संजय आव्हाड, शरद कोके, अभिजित अष्टेकर, अशोक तुपे, पप्पू भाले, रमेश खेडकर, अंगद महानवर आदि उपस्थित होते.

याप्रसंगी बाळासाहेब बोराटे म्हणाले, आपले राष्ट्रपुरुष हे सर्वांसाठी वंदनीच आहे, त्या महापुरुषांचा चुकीचा इतिहास जनतेसमोर मांडून संभ्रन निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाचे नेते गेल्या काही दिवसांपासून करत आहे. त्यांच्या अशा वक्तव्यांने जनेतमध्ये तीव्र चिड निर्माण होत आहे. अशी प्रवृत्ती वेळेच ठेचली जाईल, असे सांगितले. यावेळी लोकांकडून चिल्लर गोळा करुन मंत्री पाटील यांच्या प्रतिमेवर उधळण्यात आली. तसेच त्यांच्या प्रतिमा पायदळी तुडविण्यात आली व निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

समता परिषदेनेे प्रतिमेस मारले जोडे

अहमदनगर | Ahmednagar

महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाच्या उन्नत्तीसाठी मोठे योगदान दिले आहे, समाजासाठी मोठा त्याग केला आहे. जनसामान्यांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. परंतु काही अपप्रवृत्तीकडून सातत्याने त्यांची बदनामी करण्यात येत आहे. यापुढील काळात मंत्री चंद्रकांत पाटील यांना नगर जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव यांनी दिला.

थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल अपशद्ब बोलणारे भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधासाठी नगरमध्ये अखिल भारतीय समता परिषदेच्यावतीने प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, मच्छिंद्र गुलदगड, प्रशांत शिंदे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्त कावरे, संदिप दातरंगे, शरद कोके, स्वाती सुडके, अप्पा बोरुडे, अतुल चिपाडे, सुनिल सुडके, अक्षय आगरकर, निलेश गाडळकर, आजेश जाधव, आकाश खंदारे, मिलन सिंग, विशाल गायकवाड, ऐश्वर्या गारडे, केदार फुलसौंदर, आर्यन गिरमे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी अंबादास गारुडकर म्हणाले, समाजातील थोर राष्ट्र पुरुषांनी केलेल्या कार्याची माहिती चुकीचे पद्धतीने समाजासमोर मांडण्याचे प्रकार म्हणजे, त्या थोर व्यक्तींबरोबरच समाजाचा अपमान आहे. असा चुकीचा इतिहास लोकांना सांगणारे लोक त्यांचे कार्य कमी लेखू पाहत आहे. अशा गोष्टी कदापी सहन केल्या जाणार नाही. समता परिषदेच्या माध्यमातून राज्यभर त्या विरोधात आंदोलने केली जातील, असे सांगितले.

यावेळी माळीवाडा येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगबाद येथे राष्ट्रीय पुरुषांबाबत जे वक्तव्य केले त्याचा निषेध करुन घोषणा देण्यात आल्या.

निषेधासाठी राष्ट्रवादीने केली निदर्शने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर चंद्रकांत पाटील यांचा निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली. महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व कर्मवीर भाऊराव पाटील आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अंबादास गारुडकर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, ज्ञानदेव पांडूळे, उद्योग व व्यापार सेलचे अनंत गारदे, ओबीसी सेलचे अमित खामकर, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, महिला राष्ट्रवादीच्या रेश्मा आठरे, युवती सेलच्या अंजली आव्हाड, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, उपाध्यक्ष अमोल कांडेकर, सरचिटणीस गणेश बोरुडे, साधना बोरुडे, मारुती पवार, रेणुका पुंड, अजय दिघे, स्वाती सुडके, रोहिणी अंकुश, अंकुश मोहिते, अब्दुल रऊफ खोकर, उमेश धोंडे, वसिम शेख, शाहनवाझ शेख, अभिजीत ढाकणे, अर्जुन चव्हाण आदींसह राष्ट्रवादीचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, ज्या महापुरुषांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले, त्यांच्याबद्दल भिक मागून शाळा काढल्याचे गैरउद्गार काढणे निंदनीय आहे. भाजपचे मंत्री, नेते, पदाधिकारी हे जाणीवपूर्वक वादग्रस्त विधान करुन महाराष्ट्रातील महापुरुषांचा वारंवार अपमान करीत आहे. त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे.

या महापुरुषांच्या उपकारातून उतराई होण्याचे कार्य करण्याऐवजी त्यांच्याबद्दल चुकीचे बरळले जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी जो शब्द वापरला तो चुकीचा असून, योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरण्यासाठी या महापुरुषांनी काढलेल्या शिक्षण संस्थेत पुन्हा शिक्षण घेण्याची गरज असल्याचा टोला त्यांना लगावला. अंबादास गारुडकर यांनी या महापुरुषांनी समाजाला शिक्षणाची दिशा दिली. एका उच्च शिक्षण मंत्रीने असे वादग्रस्त विधान करणे निंदनीय आहे. महापुरुषांची चेष्टा सत्ताधारी मंडळींनी चालवली असल्याचा आरोप त्यांनी केला.

नाक रगडून माफीची काँग्रेसकडून मागणी

अहमदनगर | Ahmednagar

शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निषेध आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पाटलांच्या कार्टून प्रतिमा काँग्रेस कार्यकर्त्यांनी उलट्या टांगत त्या पायदळी तुडवल्या. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी या प्रतिमांना चोेप देत त्या फाडल्या. भारतीय जनता पार्टी जाणीवपूर्वक महाराष्ट्राचा अवमान करत आहे. हा अवमान मनाला अत्यंत वेदना देणारा आहे. यामुळे समाजाच्या भावना प्रचंड दुखावल्या असून पाटील यांनी नाक रगडूनच महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी यावेळी काळे यांनी केली.

महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री पाटील यांनी काल पैठण येथे एका कार्यक्रमात केले होते. या वक्तव्यानंतर नगर शहरातील संतप्त झालेले काँग्रेस कार्यकर्ते काळे यांच्या नेतृत्वाखाली रात्री उशिरा एकत्र जमले. यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. चंद्रकांत पाटलांच्या विरोधात यावेळी निषेधाच्या जोरदार घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी महिला, युवकांची देखील उपस्थिती मोठी होती. चंद्रकांत पाटील यांना नगर शहरात आल्यास काँग्रेस कार्यकर्ते त्यांना नगरमध्ये फिरू देणार नाहीत, असा इशारा यावेळी काळे यांनी बोलताना दिला.

काळे म्हणाले की, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले या दांपत्याने वेळप्रसंगी तत्कालीन काळात समाजाच्या अवहेलनेला तोंड दिले. अत्यंत संघर्षातून शिक्षणाच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं. शिक्षण क्षेत्रात त्यांनी अमुलाग्र काम केलं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वटवृक्षाप्रमाणे काम केलं. हे काम करत असताना या सर्वांनी समाजाच योगदान लोकसभागासह मिळवत समाजालाही या शिक्षणाच्या यज्ञात सहभागी करून घेतलं. अशा पवित्र कार्यात सामाजिक योगदान आणि लोकसहभाग मिळवण्याच्या कामाला भीक मागितली असं म्हणत भारतीय जनता पार्टी जाणीवपूर्वक महाराष्ट्राचा अवमान करत आहे. हा अवमान मनाला अत्यंत वेदना देणारा आहे. यामुळे समाजाच्या भावना प्रचंड दुखावल्या असून पाटील यांनी नाक रगडूनच महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे.

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेस नेते अनिस चुडीवाला, माजी नगरसेवक फैयाज शेख, मुकुंद नगरचे युवा नेते शम्स खान, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, सावेडी विभागप्रमुख अभिनय गायकवाड, काँग्रेस शहर उपाध्यक्ष अभिनय गायकवाड, साबीरभाई शेख, शहर जिल्हा महासचिव इमरान बागवान, माजी नगरसेविका जरीना पठाण, जेष्ठ महिला नेत्या काँग्रेस उपाध्यक्ष डॉ. जाहिदा शेख, ओबीसी काँग्रेस विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक मंगलताई भुजबळ, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, रोजगार व स्वयंरोजगार काँग्रेस विभाग जिल्हाध्यक्ष राणीताई पंडित, महिला सरचिटणीस मिनाज सय्यद, सरचिटणीस अर्चना पाटोळे, काँग्रेस अपंग विभाग शहर जिल्हा समन्वयक सोफियान रंगरेज, संतोष जाधव, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र साळुंखे, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर कांबळे, आकाश जाधव, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, प्रशांत जाधव, बिभीशन चव्हाण, सचिव गणेश आपरे, शंकर जगताप, अल्पसंख्यांक ख्रिश्चन विभागाचे अजय मिसाळ, राजू साळवे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फुले ब्रिगेडकडून चंपावाणी निषेधच्या घोषणा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

फुले ब्रिगेडच्यावतीने भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला. माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करुन ‘चंपावाणी निषेधा’च्या घोषणा देण्यात आल्या.

महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात फुले ब्रिगेडचे शहर अध्यक्ष दिपक खेडकर, महिला जिल्हाध्यक्ष रेणूकाताई पुंड, फुले ब्रिगेड सावेडी शहर अध्यक्ष किरण जावळे, केडगाव शहर अध्यक्ष महेश गाडे, भिंगार शहर अध्यक्ष संतोष हजारे, प्रसाद बनकर, गणेश जाधव, मोहित सत्रे, स्वप्निल पडोळे, विक्रम बोरुडे, विश्वास शिंदे, संकेत लोंढे, संकेत ताठे, आशिष भगत, महेश सुडके, गणेश शेलार, रेमेश पुंड, यश लिगडे, गणेश बोरुडे, बबलू फाळके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शहर अध्यक्ष दिपक खेडकर म्हणाले की, ज्या बहुजन समाजाला कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाची दारे उघडी करुन दिली, त्यांच्याबद्दल चुकीचे विधान निंदनीय आहे. वादग्रस्त व अज्ञानपणाचे विधान करुन समाजात असंतोष पसरविण्याचे काम सत्ताधारी नेते व मंत्री करीत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात महापुरुषांबद्दल केलेले चुकीचे विधान खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट करुन, या महापुरुषांच्या संघर्षातून चुकीचे विधान करणार्याला मंत्र्याला शिक्षणाची भीक मिळाली असल्याचा आरोप त्यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या