Tuesday, April 23, 2024
Homeजळगावट्रक-दुचाकी अपघातात मायलेकीचा मृत्यू ; पितापुत्र गंभीर

ट्रक-दुचाकी अपघातात मायलेकीचा मृत्यू ; पितापुत्र गंभीर

चोपडा – chopda

धरणगाव (dharngaon) रस्त्यावर अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ (Petrol pump) टक व दुचाकी अपघातात (accident) मायलेकीचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यु झाला तर पितापुत्र हे गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.२८ रोजी घडली

- Advertisement -

जखमींवर उपजिल्हा रूग्णालयात (hospital) उपचार सुरू असून ट्रकचालक फरार झाला आहे. घटनास्थळी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहचून पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

सदर अपघातात चोपडा (chopada) तालुक्यातील मामलदे येथील रहीवाशी उज्वला जगदीश मोतीराळे व मुलगी नेहा (वय १२) यांचा जागीच मृत्यू झाला तर जगदीश भिमराव मोतीराळे, व मुलगा भावेश मोतीराळे ( वय १०) हे जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडला.

दुचाकीवर आलेला ट्रक हा (Tata Company) टाटा कंपनीचा असून त्यात सरकी भरलेली होती. याखाली दबून हा भीषण अपघात घडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या