Thursday, April 25, 2024
Homeनगरमध्यान्ह भोजन योजना बंद करून प्रतिदिन 125 रुपये कामगारांच्या खात्यात वर्ग करा

मध्यान्ह भोजन योजना बंद करून प्रतिदिन 125 रुपये कामगारांच्या खात्यात वर्ग करा

नेवासा |तालुका प्रतिनिधी|Newasa

असंघटित कामगारांसाठी सुरू असलेली मध्यान्ह भोजन योजना त्वरीत बंद करून प्रतिदिन 125 रुपये कामगारांच्या बँक खात्यात वर्ग करा, अशी मागणी समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.

- Advertisement -

अधिक माहिती देताना डॉ.घुले म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालयाचे अंतर्गत असलेल्या कामगार कल्याण मंडळाकडून असंघटित कामगारांसाठी मध्यान्ह भोजन ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यात एका कंपनीला कामगारांना भोजन पुरविण्याचे कंत्राट मिळाले. आमदार संतोष बांगर यांना प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर ते थेट त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तेव्हा चपातीला बुरशी लागली, धान्याला कीड लागली, कांदे सडलेले आहेत असे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. आणि कामगारांच्या जीवाशी खेळू नका असं म्हणत उपाहारगृह व्यवस्थापकावरती त्यांनी आपला सर्व राग काढला. या व्यवस्थापकाच्या थेट कानाखाली लावल्याची घटना घडली.

बांधकाम मजुरांसाठीच्या मध्यान्ह भोजन योजनेला समर्पण मजदूर संघ सुरवातीपासूनच विरोध करत आहे.

कामगारांच्या अन्नात भेसळ करणार्‍या आणि मध्यान्ह भोजन योजनेच्या आडून स्वतःचं उखळ पांढरं करणार्‍या प्रत्येक घटकाचा निषेधच आहे. आमदार संतोष बांगर यांनी यावर आवाज उठवला. ते स्वागतार्हच आहे.

शिंदे सरकारने मध्यान्ह भोजन योजना त्वरीत बंद करून प्रति दिन 125 रुपये प्रमाणे पैसे नोंदीत कामगारांच्या खात्यावर वर्ग करावेत, अशी मागणी डॉ.घुले यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या