Tuesday, April 23, 2024
HomeनाशिकMHT CET 2021 : विद्यार्थ्यांनो! ‘या’ केंद्रांवर होणार सीईटीची परीक्षा

MHT CET 2021 : विद्यार्थ्यांनो! ‘या’ केंद्रांवर होणार सीईटीची परीक्षा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य सामायिक परीक्षा कक्ष (State common entrance test) यांच्यामार्फत अभियांत्रिकी (Engineering), औषधनिर्माणशास्त्र (Pharmacology) व कृषी तंत्रज्ञानासाठी (Agricultural technology) घेण्यात येणारी सीईटी २०२१ परीक्षा (CET Exam) नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) एकूण १३ केंद्रांवर दि. २० सप्टेंबरपासून सकाळ व दुपार सत्रात सुरू होणार आहे….

- Advertisement -

बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी ही प्रवेश पूर्व परीक्षा दि. २० सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. पहिल्या टप्प्यात दि.२० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर पीसीएम (PCM) ग्रुपकरिता तर दुसऱ्या टप्प्यात २५ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर पीसीबी (PCB) ग्रुपकरिता परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेण्यात येणार आहे.

परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्य सामायिक परीक्षा कक्ष यांच्या संकेतस्थळावर www.mahacet.org भेट देऊन आपले हॉल तिकीट (Hall ticket) डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यावी अशी सूचना तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक ज्ञानदेव नाठे (Dnyandev Nathe) यांनी सर्व विद्यार्थ्यांना केली आहे.

तसेच परीक्षेसंबंधित सर्व सूचना विद्यार्थ्यांनी अवगत करून घ्याव्यात जेणेकरून कुणाचीही तारांबळ उडणार नाही असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे (Bhagwat Doiphode) यांनी केले आहे.

परीक्षेच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षा केंद्रबाबतची सर्व माहिती तपासून व खात्री करून घ्यावी, अशी सूचना जिल्हा संपर्क अधिकारी सचिन पडवळ (Sachin Padwal) यांनी दिली आहे.

या केंद्रांवर होणार परीक्षा

  • फ्युचरटेक सोल्युशन, आर्टीलेरी सेंटर रोड, नाशिकरोड.

  • गुरू गोबिंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालय, वडाळा-पाथर्डी रोड.

  • जे. आई. टी अभियांत्रिकी महाविद्यालय ,गोवर्धन,गंगापूर रोड.

  • के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, अमृतधाम, पंचवटी.

  • के. व्ही. एन नाईक फार्मसी कॉलेज, डोंगरे वसतिगृह, कॅनडा कॉर्नर.

  • एम. ई. टी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन, आडगाव, नाशिक.

  • नाशिक टेस्टिंग एजन्सी, जुना गंगापूर नाका, नाशिक.

  • पी. व्ही. जी. अभियांत्रिकी महाविद्यालय ,दिंडोरी रोड, म्हसरुळ.

  • संदीप फाउंडेशन अभियांत्रिकी महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर रोड, महिरावणी.

  • संघवी अभियांत्रिकी महाविद्यालय, म्हसरुळ-वरवंडी रोड.

  • सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालय, अंजिनेरी, त्रंबकेश्वर रोड.

  • एस. एन. जे. बी. अभियांत्रिकी,चांदवड.

  • वेबईझी इन्फोटेक,दिंडोरी रोड, म्हसरुळ.

- Advertisment -

ताज्या बातम्या