Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याहवामान तज्ञ म्हणतात, घाबरू नका, ढगाळ वातावरणाचीच शक्यता

हवामान तज्ञ म्हणतात, घाबरू नका, ढगाळ वातावरणाचीच शक्यता

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उष्णतेच्या लाटेपासून (Heat Wave) दिलासा मिळत  असून कमाल तापमानही (temperature) आणखी २ डिग्रीने खाली उतरण्याची शक्यता आहे…

- Advertisement -

पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणीच केवळ अगदी किरकोळ पावसाची (Rain) शक्यता जाणवते, असा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईसह (Mumbai) संपूर्ण कोकण व मध्य महाराष्ट्रातील (नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर) जिल्ह्यात पुढील ३ दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणीच केवळ अगदी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

मराठवाडा (Marathwada}) व विदर्भात (Vidarbh) या वातावरणाची शक्यता नाही. सध्या गहू, कांदा व उशिरा धरलेल्या द्राक्षाच्या बागेत (Grapes Farm) काढणी वेगात चालू आहे.

शेतकऱ्यांनी (Farmers) विशेष घाबरून न जाता सावधतेने व सुरक्षित व झाक-पाक सामग्री हाताशी ठेवून हार्वेस्टिंग चालू ठेवण्यास हरकत नाही, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या