Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याNCP Crisis : “मी अजितदादांना रविवारी भेटले होते, पण...”; 'त्या' भेटीवर सुप्रिया...

NCP Crisis : “मी अजितदादांना रविवारी भेटले होते, पण…”; ‘त्या’ भेटीवर सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रामध्ये सत्तांतरानंतर रविवार २ जुलैच्या दुपारी अजून एक राजकीय नाट्य रंगलं. एनसीपीमध्ये शरद पवारांना दूर सारून अखेर अजित पवारांनी शिंदे- फडणवीस सरकार मध्ये सहभाग घेतला. त्यांच्यासोबत ८ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान अजित पवारांच्या या बंडामागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच शरद पवारांच्या सहभागा शिवाय नेते असं करणार नाहीत असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेत, तर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी अजित पवारांच्या निर्णयावेळी सुप्रिया सुळे उपस्थित होत्या असं शेळके यांनी म्हंटलं होतं.

- Advertisement -

या सगळ्याविषयी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली आहे. एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मी रविवारी (२ जुलै) अजित पवारांना भेटले होते. आमच्यात बराचवेळ चर्चा झाली. त्यानंतर पक्षाचे आमदार तिथे दादाला (अजित पवार) भेटायला येऊ लागले. मला वाटलं निवडणुकीची तयारी कशी करायची याची चर्चा करायला आले असावेत. दादाच्या मनात नेमकं काय चाललं आहे मला ठाऊक नव्हतं. मी तिथून निघाल्यानंतर त्याच्याकडे आलेले समर्थक आमदार आणि दादा (अजित पवार) हे राजभवनावर पोहचले. असं आता सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.

NCP Crisis : “शिंदे गुवाहाटीला असताना राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा प्लॅन होता, पण…”; प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

सुप्रिया सुळे पुढे म्हण्ल्या कि, रविवारी मी जेव्हा देवगिरीवर गेले तेव्हा अजित पवारांना भेटायला अनेक आमदार आले होते. पण मला वाटलं ते प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीससंदर्भात चर्चा करण्यासाठी आलेत. अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यासाठी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देण्याची तयारीही दाखवली होती. मी देवगिरी वरून निघाल्यावर अजित पवार राज भवनाकडे गेल्याची माहिती मिळाली.

NCP Crisis : शरद पवारांनी बंडखोरांना ठणकावले; म्हणाले, “जीवंतपणी माझ्या…”

- Advertisment -

ताज्या बातम्या