Friday, April 26, 2024
Homeजळगावतापमानाचा पारा घसरला!

तापमानाचा पारा घसरला!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सध्या हिमालयातून (Himalayas) दक्षिण दिशेने येणार्‍या वार्‍याचा वेग (Wind speed) वाढला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात गारठ्याचा (Garata) जोर वाढू लागला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानात घट (Decrease in temperature) झाली असून सकाळपासून अंगाला बोचणारा वारा वाहू लागल्याने सकाळपासून हुडहूडी वाढली आहे. तसेच आज सायंकाळी तापमानात पुन्हा घट झाल्याने शहराचे तापमान हे किमान 11 अंश सेल्सियसपर्यंत घसरले होते. दरम्यान ही हुडहुडी आठवडाभर कायम राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याने (Weather department) वर्तविला आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे चार, पाच दिवसांपासून कमी झालेली थंडी, आता हळूहळू वाढू लागलीआहे. तापमानातव घट होवून थंडी वाढल्यामुळे नागरिकांनी थंडीपासून संरक्षण करणारी स्वेटर, मफलर यांची तजवीज करुन ठेवली होती. मात्र गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे शहराचा तापमान वाढून थंडी गायब झाली होती. परंतु आता पुन्हा हवामानातील बदलामुळे वातावरणात बदल होवून शहराच्या तापमानात गारठा निर्माण झाला आहे. यामुळे सकाळपासूनच अंगाला बोचणारे वारे वाहत असल्याने थंडीची हुडहुडी वाढली आहे. तसेच येत्या आठवड्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. तापमानात मोठया प्रमाणात घट होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले

आधीच कोरोनाची धास्ती त्यात ओमायक्रॉनच्या एन्ट्रीने निर्माण झालेली साशंकता आणि आता त्यात विचित्र हवामानामुळे वाढलेले आजार यामुळे खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढत असून ढगाळ वातावरणामुळे अस्थमा, संधिवाताने बेजार रुग्ण देखील अधिकच मेटाकुटीला आले आहेत. लहान मुलांसह वृद्धांना या वातावरणाने अधिक बेजार केले असून सर्दी, खोकला, कफाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात उद्भवल्या आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णालये गर्दीने भरलेली आहेत.

स्वेटर विक्रेत्यांची दुकाने गर्दीने फुलली

गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली होती. मात्र आता तापमानात घट झाल्याने हुडहुडी वाढली आहे. त्यामुळे शहरातील स्वेटर विक्रेत्यांची दुकाने ओस पडलेल्या दुकानांवर स्वेटरसह हातमोजे, कानटोपी व मफलरची खरेदीकरण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.

अजून घसरणार पारा

गेल्या काही दिवसांपासून हवामानात झपाट्याने बदल जाणवत आहे. डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजेच येणारा आठवडा जळगावात देखील हाड गोठवणारा ठरु शकतो. तसेच पुढील चार ते पाचही दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता देखील त्यांच्याकडून वर्तविण्यात आली असून येत्या चार दिवसात तापतानात आणखी घट होवून जिल्ह्याचे तापमान आठ अंशापर्यंत येण्याचा अंदाज वेलनेस वेदर फाऊंडेशने वर्तविला आहे.

सुक्यामेव्याला मागणी

थंडीत शहराचे तापमान वाढल्याने शरीराचे तापमान वाढण्यासाठी सुकामेव्यासह मेथी व डिंकाचे लाडू बनवित असतात. परंतु गेल्या महिन्यात थंडीच नसल्याने महिलांकडून लाडू बनविण्याकडे पाठ फिरविली होती. मात्र आता गोठविणारी थंडी पडू लागल्याने महिलांकडून सुकामेव्यासह डिंक व मेथीच्या लाडू बनविण्याची लगबग सुरु झाली आहे. तसेच बाजारपेठेत रेडीमेड लाडू देखील विक्रीसाठी आले असून ग्राहकांची रेडीमेडला देखील पसंती दिली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या