Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशझुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए : सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए : सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. तीन कृषी कायदे (New farm law) मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होऊ लागले.

भक्त कहते थे मोदी है नही झुकेगा ,

- Advertisement -

‘झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए’

यूपी चुनाव में हार देखते हुए तीनों कृषि क़ानून वापस लिए गए ।

#मोदी_का_घमंड_हारा

कृषी कायदे रद्दच्या विषयाला एकाने पेट्रोल-डिझेल दरवाढीशी जोडला आहे. आता पेट्रोल-डिझेलची किंमत कमी करुन द्या, असे म्हटले आहे.

तीन महिन्यांनी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकीच्या दृष्टिने सोशल मीडिवर कृषी कायदे माघारीचा निर्णय पाहिला जात आहे. आता मते खूप मिळतील, असे एका युजरने टि्वट केले आहे.

केंद्र सरकारने 20 सप्टेंबर 2020 रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले. त्या कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्यासाठीचं हे आंदोलन सुरू आहे. खरं तर पंजाबमधील शेतकरी कायदे मंजूर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच म्हणजे सप्टेंबरपासून आंदोलन करत आहेत.

या तीन कायद्यांची नावं आहेत –

1. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, 2020

2. शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक, 2020

3. अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, 2020

अनेक जण या निर्णयावर आनंदीत होत असले तरी काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय देशातील लहान शेतकऱ्यांसाठी काळा दिवस असल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या