Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकएक कोटींच्या औषध खरेदीवरून सदस्य संतप्त

एक कोटींच्या औषध खरेदीवरून सदस्य संतप्त

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण ऐनवेळी तब्बल ३१ विषय असल्याने सदस्य संतप्त झाले. सभेतील अनेक सदस्यांनी ऐनवेळच्या विषयांना हरकत घेतल्याने अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना सभा तहकूब करावी लागली.

- Advertisement -

दरम्यान,आरोग्य विभागातील एक कोटींच्या औषध खरेदीचा विषय आला.या विषयावरून सदस्य आक्रमक झाले अन त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. जि. प.ची सर्वसाधारण सभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन झाली.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा म्हटली की, ऐनवेळी प्रशासनाकडून ठेवण्यात येणाऱ्या विषयांवर अनेकदा रणकंदन झालेले आहे. असे असतानाही सोमवारी (दि.१४) झालेल्या आँँनलाईन सभेत ऐनवेळी तब्बल ३१ विषय आल्याने सदस्य संतप्त झाले.

भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, राष्ट्रवादीचे गटनेते उदय जाधव यांनी ऐनवेळच्या विषयांना तीव्र विरोध दर्शविला. महिन्याभरापूर्वी सभेची तारीख निश्चित झालेली असताना ऐनवेळचे विषय घुसविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

सभेतील अनेक सदस्यांनी ऐनवेळच्या विषयांना विरोध दर्शविल्याने अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना सभा तहकूब करावी लागली.

सभेत एकूण ४४ विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आले होते. यातील १३ विषय हे नियमित तर, तब्बल ३१ विषय ऐनवेळीचे होते. प्रत्यक्ष सभागृहात सभा असताना सदस्यांना विषय पत्रिका देण्यात येते. मात्र, आँँनलाईन सभा असल्याने सदस्यांना नियमित विषयांचाच अजेंडा पाठविण्यात आला होता. त्यामुळे सदस्यांकडे ऐनवेळचे विषय नसल्याने गोंधळ होत होता.

नियमित विषय झाल्यानंतर, ऐनवेळचे विषय मांडण्यास सुरूवात झाली. मात्र, हे विषय जास्त असल्याने, डॉ. कुंभार्डे यांनी या विषयांना आक्षेप घेतला. सभा ऐनवेळी होत नसून तीन महिन्यातून एकदा होते.

असे असतानाही ऐनवेळी विषय का येतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. उदय जाधव, दीपक शिरसाठ या सदस्यांनाही सभा आँँनलाईन आहे, सभेत विषय लक्षात येत नसल्याचा मुद्दा मांडला.

स्वंतत्र सभा घेण्याचा ठराव

डॉ. कुंभार्डे यांनी कोविडचे विषय वगळता ऐनवेळेच्या विषयांसाठी स्वंतत्र सभा घेण्याचा ठराव केला. त्यावर, अध्यक्ष क्षीरसागर यांनी सभा तहकूब करत, पुढील सभेची तारीख लवकरच घोषीत केली जाईल,असे जाहीर केले.

औषध खरेदीचा विषय

आरोग्य विभागातील एक कोटींच्या औषध खरेदीचा विषय आला. या विषयावरून सदस्य आक्रमक झाले अन त्यांनी प्रशासनाला चांगलेच खडेबोल सुनाविले. मार्चमध्ये निधी येऊनही उशाराने विषय मंजुरीला आल्याने सदस्यांना संताप व्यक्त केला.

सभा ठरलेली असतानाही ऐनवेळी सभेत विषय येतात कसे, सभेत विषय घ्यायचे नाही ठरलेले असतानाही विषय घेताच कसे असा सवाल सिध्दार्थ वनारसे, लता बच्छाव, मनिषा पवार यांनी केला. त्यामुळे ऐनवेळेचे विषय नकोच अशी भूमिका सदस्यांनी सभेत घेतली. उपस्थित बहुतांश सदस्यांनी ऐनवेळेचे विषय पत्रिका नसल्याने सभा नंतर घ्यावी,अशी मागणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या