Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हा परिषदेत मेगा भरती

जिल्हा परिषदेत मेगा भरती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात मेगा भरतीची घोषणा करण्यात आली. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया ही आजपासून राबवण्यात येणार आहे. यामध्ये 20 संवर्गातील तब्बल 1038 पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असून यासंदर्भातील जाहिरात ही नाशिक जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

- Advertisement -

सरळसेवेने भरावयाच्या पदाकरीता संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. ऑनलाईन भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात नाशिक जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीनेच आपले अर्ज सादर करावेत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रिये संबंधित आवश्यक अद्ययावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.

ही पदे भरणार

(कंत्राटी) ग्रामसेवक – 50, आरोग्य पर्यवेक्षक – 3, आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक (महिला) – 597, आरोग्य सेवक (पुरुष) 40% – 85, आरोग्य सेवक (पुरुष) 50%- 126, औषध निर्माण अधिकारी – 20, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 14, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – 2, विस्तार अधिकारी(शिक्षण) (वर्ग 3 श्रेणी 2) – 7, वरिष्ठ सहाय्यक – 3, पशुधन पर्यवेक्षक – 28, कनिष्ठ आरेखक – 2, कनिष्ठ लेखा अधिकारी – 1, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – 5, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) – 22, मुख्य सेवीका / पर्यवेक्षिका – 4, कनिष्ठ यांत्रिकी – 1, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा पु.) – 34, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य ) इवद – 33, लघुलेखक (उच्च श्रेणी) – 1 – एकूण = 1038

- Advertisment -

ताज्या बातम्या