१५ व्या वर्षी टाईम मॅग्झीनच्या कव्हर पेजवर स्थान मिळवणारी कोण आहे गीतांजली राव

jalgaon-digital
4 Min Read

खेळायच्या, बागडायच्या वयात खूप काही वेगळी करणारी मुले आहेत. अशाच मुलांचा शोध घेण्यासाठी टाईम मॅग्झीन प्रथमच किड ऑफ द ईयर नॉमिनेशन मागितले. त्यासाठी तब्बल पाच हजार मुलांचे नामांकन आले. परंतु पहिली ठरली गीतांजली राव अन् तिला मिळाले टाईम मॅग्झीनच्या कव्हर पेजवर स्थान. कोण आहे ही गीतांजली राव आणि काय केले तिने ज्यामुळे अनेक मोठ्या व्यक्तींना टाईम मॅग्झीनच्या कव्हरपेजवर स्थान मिळवता आले नाही परंतु तिला मिळाले. जाणून घेऊ या सर्व काही…

एंजेलिना जोलीने घेतली मुलाखत

हॉलिवूडची अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती एंजेलिना जोली हिने मुलाखत घेणे हा एक मोठा सन्मान आहे. तिने गीतांजली रावची नुकतीच मुलाखत घेतली. त्यात तिने या पुरस्काराच्या निमित्ताने आपल्या रिसर्चबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्यात.

मुलाखतीत एंजेलिना जोली यांनी विज्ञान हे तुझे पॅशन आहे हे तुला कधी समजले? असा प्रश्न विचारल्यावर तिच्या चेहऱ्यावर हसू होते. ‘कुणाच्या चेहऱ्यावर हसू दिसेल हे माझे रोजचे ध्येय असते. दुसरी तिसरीत असताना विज्ञानाच्या माध्यमातून आपण समाजात बदल घडवू शकतो असे मला वाटायचे. मला टिपिकल शास्त्रज्ञ बनायचं नाहीये. जगात पर्यावरण बदल आणि सायबर गुंडगिरीची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. या सगळ्या आव्हानांवर आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मात देता येऊ शकते,’ असे गीतांजलीने सांगितले.

गीतांजली मूळ भारतीय वंशाची

अमेरिकन असलेली गीतांजली मूळ भारतीय वंशाची आहे. अवघ्या १० वर्षांची असताना तिने आपल्या पालकांना पिण्याच्या पाण्यातील प्रदूषण ओळखणाऱ्या यंत्राचा शोध लावायचे आहे, असे सांगितले. हे ऐकून तिची आई बुचकळ्यातच पडली होती. तिच्या या भन्नाट कल्पनेस तिने खोडा घातला नाही. उलट त्यासाठी अनुकूल वातावरण तयार करुन दिले.

यंग सायंटिस्ट पुरस्कार

गीतांजलीला यापुर्वी डिस्कवरी एज्युकेशनचा यंग सायंटिस्ट चॅलेंज पुरस्कार मिळाला आहे.. अमेरिकेतल्या महत्त्वाच्या शास्त्रज्ञांबरोबर काम करायची संधीही तिला मिळाली. ३० वर्षांच्या आतील ३० शास्त्रज्ञ या फोर्ब्स मासिकाच्या यादीत मागच्या वर्षी तिचे नाव होते.

काय काय केले संशोधन

गांजापासून दूर करणारे यंत्र

जेनेटिक इंजीनियरिंगचे एक यंत्र बनवल्यामुळे ‘हेल्थ पिलर प्राइज’ तिला मिळाले. हे यंत्र गांजा आणि इतर ड्रग्जच्या व्यसनापासून लांब राहण्यासाठी उपयोगी पडते. त्यामुळे गांजा व्यसनाची सुरवातीची स्टेज आपल्याला समजते. त्यातून बाहेर पडणंही शक्य होते.

पाण्याचे प्रदूषण शोधणारे यंत्र

अमेरिकेतली अनेक राज्य आज पाण्यात शिसे या धातूची मिसळ असते. परंतु पाण्यात शिसे शोधणं ही खूप खर्चिक गोष्ट आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेऊन ते लॅबमधे पाठवले जातात. त्याचे मोजमाप करणंही तितकंच अवघड असते. त्यामुळे पाण्यात शिसे धातू आहे की नाही हे शोधण्यासाठी एका सोप्या यंत्राचा शोध गीतांजलीने लावला. हे यंत्र मोबाईलसारखे दिसते. त्यात ९ व्होल्टेजच्या बॅटरीचा वापर केला. काही सेकंद पाण्यात टाकल्यानंतर, या यंत्राला कनेक्ट केलेले अॅप पाण्यात किती शिसे आहे हे सांगते.

ट्रोलर्सचा खेळ बिघडवणारा शोध

सोशल मीडियाचा वापर करून लोकांना अश्लील मॅसेज पाठवणे, खाजगी फोटोंचा वापर करून फोटो इकडे तिकडे फिरवणे यासारख्या अनेक गोष्टी सायबर क्राइममध्ये येतात. सायबर क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून एक वेगळा शोध गीतांजलीने केले. तिने एक फोन आणि वेब यंत्र तयार केले. ‘किंडली’ नावाचं हे अँप आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सायबर गुन्हेगारी आपण क्षणार्धात पकडू शकतो. एखाद्याविषयी आपण जाणूनबुजून चुकीचा शब्द टाईप करत असलो तर हे फोन किंवा वेब यंत्र आपल्याला एक ऑप्शन देते. चुकीचा शब्द पुढं पाठवणं किंवा त्याला एडिट करणे. अर्थात पर्याय आपल्याला निवडायचा असतो. सोशल मीडियाचा वापर करताना आपण बऱ्याच चुका करतो. अशा वेळी त्या चुका सुधारण्यासाठी एक संधी आणि इशारा दोन्ही गोष्टी गीतांजलीचा शोध देऊ शकतो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *