Friday, April 26, 2024
Homeनगरविद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वैद्यकीय परीक्षा पुढे ढकला

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वैद्यकीय परीक्षा पुढे ढकला

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

राज्यातील विविध दंत महाविद्यालये, बी.ए. एम. एस, बी. एच. एम. एस, नर्सिंग आदींच्या परीक्षा येत्या 14 डिसेंबरपासून घेण्यात येणार आहेत. असे असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांचे क्लिनिकल पोस्टींग 1 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याने विविध वैद्यकिय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आमदार नीलेश लंके यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

- Advertisement -

आ. लंके यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. पत्रात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्यातील विविध दंत महाविद्यालयात बी.डी.एस. चे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, बी. ए.एम.एस, बी.एच. एम. एस, नर्सिंग आदींच्या परीक्षा 14 डिसेंबरपासून सुरू होत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांचे क्लिनिकल पोस्टिंग 1 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे हा विरोधाभास आहे.

बहुतांश विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीसाठीची रजा देखील रद्द केल्याच्या तक्रारही अनेक विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.क्लिनिकल पोस्टींग व त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच परीक्षेला सामोरे जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होणार असल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.

पेपरमध्ये चार दिवसाचे अंतर असावे

14 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या आगामी परीक्षा किमान विस दिवस पुढे ढकलण्यात याव्यात. दोन पेपरमध्ये किमान तीन ते चार दिवसांचे अंतर असावे. त्याबाबत विद्यार्थी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आ. लंके यांनी या पत्राद्वारे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या