Saturday, April 27, 2024
Homeजळगाव'मीम’ च्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.सुधीर भटकर

‘मीम’ च्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.सुधीर भटकर

जळगाव – Jalgaon :

(Media Educators Association of Maharashtra) मीडिया एज्युकेटर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम) संघटनेची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातील कार्यरत प्राध्यापकांची संघटना तयार करण्यात आलेली आहे. या संघटनेची नुकतीच ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे.

संघटनेच्या अध्यक्षपदी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.सुधीर भटकर तर कार्याध्यक्षपदी अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.रवींद्र चिंचोलकर यांची निवड करण्यात आली आहे.

उपाध्यक्षपदी मुंबई विद्यापीठ पत्रकारिता विभागाचे प्रा.डॉ.सुंदर राजदीप, सचिव प्रा.डॉ.विनोद निताळे (जळगाव), सहसचिव प्रा.डॉ.शाहेद शेख (औरंगाबाद), कोषाध्यक्ष प्रा.डॉ.रोहित कसबे (नाशिक), तर सदस्य म्हणून प्रा.डॉ.कुमार बोबडे (अमरावती), प्रा.डॉ.संजय तांबट (पुणे), प्रा.डॉ.शिवाजी जाधव (कोल्हापूर), प्रा.डॉ.मोईज हक (नागपूर), प्रा.डॉ.सुहास पाठक (नांदेड) यांची निवड करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या