Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदंत वैद्यकसह एमबीबीएसच्या २६२ जागा राज्याकडेच

दंत वैद्यकसह एमबीबीएसच्या २६२ जागा राज्याकडेच

नाशिक | प्रतिनिधी

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत राज्यातून केंद्रीय कोट्यातील २२२, तर दंतवैद्यकच्या ४० अशा २६२ जागा दुसऱ्या यादीनंतरही रिक्त राहिल्याने त्या पुन्हा महाराष्ट्राच्या कोट्यात वर्ग करण्यात आल्या आहेत. यामुळे वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. ..

- Advertisement -

मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू असताना दुसऱ्या फेरीनंतर बहुतांश सरकारी तसेच पालिका रुग्णालयांतील जागा भरल्या गेल्या आहेत. मात्र केंद्रीय कोट्यातील जागा रिक्त राहिल्याने केंद्राकडून राज्यांना जागा पुन्हा वर्ग करण्यात आल्या आहेत…

महाराष्ट्रातून देण्यात येणाऱ्या एमबीबीएसच्या २२२ आणि दंतवैद्यकच्या ४० जागा राज्याकडे पुन्हा वर्ग करण्यात आल्या आहेत. प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही, तर काहींनी प्रवेश रद्द केल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत. यामुळे या जागा पुन्हा राज्यांना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या