Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाबोगस प्रमाणपत्र समर्पणासाठी 31 मे अखेरची मुदत

बोगस प्रमाणपत्र समर्पणासाठी 31 मे अखेरची मुदत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेत पाच टक्के आरक्षण (Reservation) ठेवलेले आहे. काही उमेदवारांनी बोगस क्रीडा प्रमाणपत्र (fake sports certificate) धारण करून क्रीडा विभागाकडून (sports department) क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी करून शासकीय सेवेचा लाभ घेतला आहे, अशा उमेदवारांनी त्यांचे मुळ क्रीडा प्रमाणपत्र व क्रीडा पडताळणी अहवाल 31 मे 2022 पूर्वी समर्पण करण्याचे आवाहन आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे बकोरिया यांनी केले आहे…

- Advertisement -

ज्या उमेदवारांनी बोगस क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालयामध्ये नोकरी (job) धारण केली आहे, अशा युवा उमेदवारांना भविष्यात अडचण निर्माण होवू नये यासाठी एक संधी म्हणून बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना हा शासन निर्णयान्वये घेतलेला धोरणात्मक निर्णय आहे.

आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे या कार्यालयात उमेदवारांनी समर्पित करावयाचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या