Thursday, April 25, 2024
Homeधुळेवसतिगृहात प्रसूतीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

वसतिगृहात प्रसूतीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

साक्री

साक्री शहरातील सावित्रीबाई फुले आदिवासी मुलींच्या वसतिगृहात नवजात बालकाला जन्म दिल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात संशयीत मुलासह आरोग्याधिकार्‍यांचाही समावेश आहे.

- Advertisement -

साक्री पोलीस ठाण्यात पोहेकाँ युवराज वेडू बागुल यांनी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दि.28 फेब्रूवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास वसतीगृहाच्या शेजारी एका शाळेच्या भिंतीलगत नवजात बालक आढळून आले. मात्र या बालकाची आई याच वसतीगृहातील विद्यार्थीनी असून तिने टॉयलेटमध्ये स्वतःची प्रसुती करुन घेतल्याच्या घटनेचे बिंग फुटले.

संबंधित पीडित मुलीवर तिच्या गावाकडील मुलगा रवी रहेम्या पाडवी याने वेळोवेळी बलात्कार करुन तिला गर्भवती केले. 9 महिने पुर्ण झाल्यानंतर त्या मुलीने पुरुष जातीच्या अर्भकास जन्म दिला. त्याला सावित्रीबाई फुले शासकीय मुलींचे वस्तीगृहाचे अधिक्षक अश्विनी पुंडलीकराव वानखेडे, शिपाई सुनंदा पांडुरंग परदेशी, मदतनिस सपना राजेंद्र धनगर व तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी तसेच आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडील यंत्रणा यांनी सदरचा गुन्हा लपविण्यासाठी मदत केली.

त्यांच्या फिर्यादीवरून साक्री पोलीस ठाण्यात भाग 5 गुरन 39/2020 भादंवी कलम 376,118, 166,177,202, लैंगिक गुन्हयापासुन बालकांचे संरक्षण कायदाचे कलम 2012 चे कलम 4,5,ग 2 चे 176,177,202, बालकांचे संरक्षण कायद्याचे कलम 2012 चे कलम कलम 21 प्रमाणे संशयीत मुलगा रवी रहेम्या पाडवीसह या पाचही जणांवर गुन्हा दाखल झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या