Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याशहीद जवान संतोष गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान संतोष गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

नाशिक तालुक्यातील लहवित गावातील (Lahvit village) इंडियन आर्मी (Indian Army) मधील सैनिक संतोष विश्वनाथ गायकवाड (Santosh Vishwanath Gaikwad) हे आसाम/सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असताना ऐन दिवाळीच्या (Diwali) दिवशी देशासाठी शहीद झाले. आज सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले…

- Advertisement -

संतोष गायकवाड यांची लष्करात सोळा वर्षे सेवा झालेली होती. ते दहा महिन्यांनी सेवानिवृत्त होणार होते, पंरतु त्याअगोदरच त्यांना वीरमरण आले. गायकवाड यांच्या पश्चात पत्नी (Wife) दोन मुली, एक मुलगा आई-वडील, भाऊ असा परिवार आहे

दरम्यान, शहीद संतोष गायकवाड देवळाली कॅम्प (Devali Camp) येथील महाविद्यालयाचे (college) माजी विद्यार्थी (Students) होते. तसेच ते जेव्हा सुट्टीवर येत असत तेव्हा ते कॉलेजला भेट द्यायचे. कॉलेजमध्ये ते एअरमन म्हणून प्रसिद्ध होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या