Friday, April 26, 2024
Homeनगरबाजारात चकाकले नाताळचे स्टार

बाजारात चकाकले नाताळचे स्टार

अहमदनगर (प्रतिनिधी) –

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे ख्रिश्चन बांधवांचा पवित्र सण असणार्‍या नाताळच्या तयारीसाठी लगबग सुरु आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ सणासाठी बाजारपेठ सजली आहे.

- Advertisement -

कपडे, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. शहरातील चर्चमध्ये आकर्षक सजावट व ़रोषणाई करण्यात येत आहे. विविध खाद्य पदार्थ बनविण्यात महिलावर्ग व्यस्त आहे. एकूणच नातळचा उत्साह दुणावला असल्याचे पाहायला मिळत आहे. नगरला ख्रिस्ती बांधव मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे नाताळ सणाचा मोठा उत्साह असतो. तारकपूर, कोठी, डॉन बॉस्को, भिंगार यासह अनेक भागांत नाताळ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या सणासाठी घरांवर आकर्षक रोषणाई व सजावट केली जाते. त्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होताना दिसते. तसेच आबाल वृद्धांसाठी कपडे खरेदी केले जातात. नाताळसाठी ख्रिस्ती बांधवांकडून केक, मिठाई आणि चॉकलेटची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. नाताळासाठी खास केक विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. शाळांमध्ये नाताळ सणाचे सेलिब्रेशन होत असल्याने विद्यार्थीही या सणासाठी उत्सूक असतात.

सांताक्लॉज..

ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी दुकानांमध्ये वस्तूंची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. सांताक्लॉजचा ड्रेस, मुखवटा, टोपी, तसेच चांदणी, खेळणी, ख्रिसमस ट्री, वेगवेगळे स्टॅच्यू, गव्हाणी, प्रभू येशूचे पोस्टर्स, हँगिंग बेल, रंगीबेरंगी बॉल, कागदी तसेच मेटल स्टार, आकर्षक लाईटींग, फुगे, कंदील खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या