Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याLive Updates : शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची आज बैठक

Live Updates : शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची आज बैठक

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आज दुपारी साडेचार वाजता महाविकास आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली.Cyclone Mocha : अंदमान समुद्रात सुरु झालेल्या मोचा चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे वादळ सध्या कॉक्स बाजारच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 700 किमी अंतरावर आहे. गेल्या 6 तासात हे चक्रीवादळ 10 किमी प्रतितास वेगाने ईशान्येकडे हळूहळू सरकत आहे. हे वादळ आज दुपारच्या सुमारास कॉक्स बाजार (बांग्लादेश) आणि क्यवप्यूमधील (म्यानमार) किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे वादळ अतिशय वेगाने किनारपट्टीवर धडकेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.’सबसे कातील गौतमी पाटील’ रोजच चर्चेत असते. गौतमीने फार कमी वेळेत प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. गौतमी आपल्या गावात येणार म्हटल्यावर कार्यक्रमाची जय्यद तयारी सुरू होते. अगदी लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांच्या अंगात उत्साह संचारतो.

गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलं आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे गौतमीचा जिथे कार्यक्रम होतो, तिथे कुरबूर होतेच होते. मोजके अपवाद सोडले, तर गौतमीच्या कार्यक्रमात राडा होतोच. पण, आता गौतमीच्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होतोय. गौतमी पाटीलने चक्क स्टेजवरून खाली येत प्रेक्षकांसोबत धरला ठेका, पाहा VIDEO२०१९ मध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथविधी करून सरकार स्थापन केले होते. त्यानंतर या शपथविधीवरून विविध दावे केले जात असून आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे…पहाटेच्या शपथविधीबाबत भाजप नेत्याचे मोठे विधान; म्हणाले, उद्धव ठाकरेंना… राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून (Heat) काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या आठवड्यात वाढत्या उन्हामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रासह देशातील बहुतांश शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा हवामान विभागाने दिला आहे…. Weather Updates : देशातील ‘या’ राज्यांमध्ये उष्णतेची लाटजम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) अनंतनाग (Anantnag) भागात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. काश्मीर पोलिसांनी ट्वीट करत या कारवाईबद्दल माहिती दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनागमधील अनंदवन संगम भागात दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक (Encounter) झाली. या चकमकीत दोन ते तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. तसेच काश्मीर पोलीस आणि लष्कराचे जवान या भागात सातत्याने कारवाई करत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. गुजरातच्या बोताड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. कृष्णा सागर तलावात बुडून पाच मुलांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (१३ मे २०२३) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. दोन मुले तलावात पोहताना बुडू लागली. त्यांना वाचवण्यासाठी इतर तीन मुलांनी तलावात उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने सर्वांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.Akola Violence : अकोला शहरातील हरिहरपेठमध्ये मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळली. या राड्यात अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. दंगलखोरांनी अनेक दुचाकी, चारचाकी पेटवल्या तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांची देखील तोडफोड केली आहे. अकोला शहरातील अनेक भागांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. Akola Violence : अकोल्यात दोन गटात तुफान राडा, दगडफेक अन् जाळपोळ… एकाचा मृत्यू, कलम १४४ लागूPM Modi on Karnataka Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचं कौतुक केलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन आणि लोकांच्या अपेक्षा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा! असं ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या तसेच राजकीय, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी पेज रिफ्रेश करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या