आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो

धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन
आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

छत्रपती घराण्याचा अपमान करणारे वक्तव्य आ. चंद्रकांत पाटील यांनी केल्याचा निषेध धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने केला असून आ. पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोेडे मारो आंदोलन करण्यात आले.

करोनाच्या महामारीत मराठा तरुणांना रस्त्यावर उतरून आंदोलन करायला सांगून नेमकं काय साध्य करू पाहत आहेत. असा आरोप धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.

महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी आरक्षणाच्या नावाने मराठा तरुणांना सत्ताधार्‍यांच्या विरोधात फूस लावून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्यापेक्षा केंद्रात जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालून मराठा समाजाला आरक्षण देण्यास भाग पाडावे व खरच महाराष्ट्र भाजपा मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे हे दाखवून द्यावे.

फक्त मराठा तरुणांना भडकवून कोरोनाच्या या महामारीत जनतेच्या जीवाशी खेळू नका, असा इशाराही धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजी राजें सोबत आहे. व मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचा राजेंना पाठींबा आहे. असे पत्रकात म्हटले असून आंदोलनात जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, माजी आ. शरद पाटील, प्रदीप जाधव, श्रीरंग जाधव, गोविंद वाघ, विलास ढवळे, रवी नागणे, वामन मोहिते, पप्पू माने, प्रकाश पाटील, साहेबराव देसाई, अतुल सोनावणे, डॉ. संजय पाटील, संजय गायकवाड, मुन्ना शितोळे, विकास बाबर, संजय बोरसे, राजू बोरसे, हनुमंत आवताडे, राजेंद्र इंगळे, अशोक सुडके, राजू जाधव, संजय बगदे, अमर फरताडे, संदीप सूर्यवंशी, संदीप चव्हाण, संदीप शिंदे, प्रा.बी. ए.पाटील, अशोक तोटे, बाळासाहेब रावळे, प्रल्हाद मराठे, जगन ताकटे, अमोल भागवत, जितु इखे, ज्ञानेश्वर पाटील, डॉ. अनिल पाटील, विनोद जगताप, गिरीश चव्हाण, निलेश काटे, दीपक रौंदल, आबा कदम, रजनीश निंबाळकर, वामन मोहिते, समाधान शेलार, बाळू भाऊ आगलावे, तुषार रावळे, रवी शिंदे, प्रकाश चव्हाण, आशिष देशमुख, मुन्ना मराठे, पवन मराठे, हेमांगी वाघ आदी सहभागी होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com