शालेय फीच्या मुद्द्यांवर मनविसेने दर्शविला विरोध

jalgaon-digital
1 Min Read

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

शाळेची फी न भरणार्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासमधून काढण्याच्या शिक्षण संस्थांच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तीव्र विरोध दर्शवित विद्यार्थ्यांना काढल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेने शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची भेट घेऊन संबंधित शाळांवर कारवाईची मागणी केली आहे.

निवेदन देते वेळी मनविसेचे नाशिकरोड अध्यक्ष नितीन धानापुणे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शशिकांत चौधरी, उमेश भोई, भाऊसाहेब ठाकरे, रंजन पगारे, गुड्डू शेख, स्वप्नील विभांडीक, जोगित पिल्ले आदी उपस्थित होते. उपासनी यांनी शाळा प्रशासन व पालक यांची बैठक बोलवून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. निवेदनाचा आशय असा- पैशांअभावी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेऊ नये असा सरकारचा आदेश असतानाही काही शाळा फीसाठी तगादा लावत आहेत.

खासगी शिक्षण संस्था इतर वेळी भरमसाठ फी घेतातच, पण करोना काळातही फीसाठी पालकांकडे तगादा लावत आहे. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. शाळा बंद असली तरी शिक्षकांचा पगार सोडून इतर कोणताही खर्च नसताना शाळा ऑनलाईन क्लासच्या नावाखाली प्रत्येक संपूर्ण फीसाठी पालकांवर दबाव आणला जात आहे.

फी न भरणार्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस मधून काढून टाकण्यात येणार असून ज्या विद्यार्थ्यांनी फी भरलेली नाही त्यांनी फी भरावी असा धमकीवजा इशारा देण्यात येत आहे. अशा शाळांचे मागील सर्व तपासून गैरव्यवहार करणार्‍या शाळांची मान्यता रद्द करावी.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *