Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकफळांचा राजा आंबा बाजारात दाखल

फळांचा राजा आंबा बाजारात दाखल

नाशिक । Nashik

फळांचा राजा हापूस आंबा बाजारपेठेत दाखल झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हापूस लवकर बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाला आहे.

- Advertisement -

आंब्याची आवक देखील अधिक आहे. सध्या बाजारपेठेत देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस विक्रीसाठी आहेत.मागील वर्षीच्या तुलनेत आंब्याच्या भावात 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हापूस वगळता इतर आंबे बाजारपेठेत दाखल होण्यास अजून अवकाश आहे. हापूस आंबे बाजारपेठेत दाखल झाले असले तरी मागणी अजून कमी आहे. दरवर्षीच लालबाग, तोतापूरी, बदामी, केशर, राजापुरी या आंब्यांना सर्वसामान्यांची मागणी असते.

मागील वर्षी करोनाचा प्रादुर्भावामुळे आंबा उत्पादित होऊनही बाजारपेठेत दाखल होऊ शकला नव्हता. परिणामी आंबा उत्पादकांचे नुकसान झाले होते. तसेच वर्षभरात निसर्गाच्या लहरीपणामुळे आंब्याला आलेला मोहोर गारपिटीमुळे गळून गेला.

परिणामी यंदा मागील वर्षीच्या तुलनेत आंब्याच्या उत्पादन कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. परिणामी आंब्याच्या भावातही वाढ झाली आहे. शहरात हापूस आंब्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत आंब्याचे दर अधिक आहे. 30 ते 40 टक्क्यांनी भाव वाढले आहेत. मागील दहा दिवसापासून आंबे बाजारपेठेत दाखल झाले आहेत. गुढी पाडव्यानंतर आंब्याच्या मागणीत वाढ होते.

– राहुल पवार , आंबा विक्रेते

आंब्याचे दर

देवगड हापूस 300 रु. किलो 500 रु. किलो

रत्नागिरी हापूस 250 रु.किलो 450 रु.किलो

- Advertisment -

ताज्या बातम्या