Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमहाविद्यालय सुरू करताना कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य

महाविद्यालय सुरू करताना कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य

औरंगाबाद – aurangabad

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असताना (Thackeray government) ठाकरे सरकारने 20 ऑक्टोबरपासून विद्यापीठ आणि महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यापीठ आणि महाविद्यालय (College) सुरू करताना कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यापीठ परिसरातील विभाग आणि महाविद्यालयांना कोरोनाच्या नियमावलीचे पत्रक पाठवले आहे. या पत्रकानुसार ज्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहे त्याच विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. या नियमांचे कडक पालन करण्याच्या सूचनादेखील या पत्रकात दिल्या आहेत.

कोरोना वाढत असल्याने गेल्या दीड वर्षांपासून शैक्षणीक क्षेत्र बंद होते. मात्र, आता कोरोना हळूहळू ओसरत असल्यामुळे सरकारने विद्यापीठ आणि महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने विद्यापीठ परिसर आणि महाविद्यालयांना कोरोना नियमावली जारी केली आहे. विद्यापीठाने यात विविध 7 नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना दिल्या आहे. प्रवेशीत विद्यार्थ्यांना कोरोना लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य असणार आहे.

प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य असेल. कोरोना प्रादुर्भावामुळे प्रतिबंधीत क्षेत्रातील जे प्रवेशित विद्यार्थी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्णयानुसार प्रत्यक्षपणे वर्गावर उपस्थित राहू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे. सरकराने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे अनिवार्य असणार आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या