Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून मॉल्स बंद, शनिवार-रविवारी विवाह समारंभ नाहीत

आजपासून मॉल्स बंद, शनिवार-रविवारी विवाह समारंभ नाहीत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाची (corona) दुसरी लाट अजून पूर्णत: ओसरलेली नाही. अशातच राज्यात डेल्टा वेरियंटचे रुग्ण वाढू लागल्याने राज्य सरकार सतर्क झाले आहे. परिणामी सर्व जिल्ह्यांना सरसकट तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध ( CoronaThird stage restrictions)लागू करण्यात आले आहेत.

- Advertisement -

नाशिकमध्ये सुरु केलेले मॉल्स ( Malls )आज सोेमवारपासून बंद केले जाणार आहेत.लग्नसोहळे केवळ सोमवार ते शुक्रवारदरम्यान होणार आहेत.

शनिवार आणि रविवारचे लग्न सोहळे बंद करण्यात आले आहेत. येत्या 5 जुलैपासून केवळ 50 नातेवाईकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवारदरम्यान लग्नसोहळे होतील.

दुपारी चारपर्यंतच दुकानादारांंना व्यवहार करता येणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे ( Collector Suraj Mandhare ) यांनी काढले आहेत.

शासन आदेशानुसार नियामांची कठोर अंमलबजावणी सुरू ठेवण्यात येणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्यास निर्बंध अधिक कठोर करण्याचे नियोजन आहे. नागरिकांंनी स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन मांढरे यांंनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या