Thursday, April 25, 2024
Homeनाशिककरोना पॉझिटिव्ह झालो तरी विचार मात्र निगेटिव्ह ठेवले नाहीत – मनपा आयुक्त...

करोना पॉझिटिव्ह झालो तरी विचार मात्र निगेटिव्ह ठेवले नाहीत – मनपा आयुक्त दीपक कासार

मालेगाव | प्रतिनिधी

करोना पॉझिटिव्ह झालो तरी विचार निगेटिव्ह ठेवले नाही. आरोग्य यंत्रणाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले. काँरन्टाईनचा नियम पाळला. नियमित व्यायाम – प्राणायाम, शाकाहारी आहार फळे, डॉक्टरांनी दिलेली औषधे आयुर्वेदिक काढा व सकारात्मक विचार या पंचसूत्रीचा अवलंब मी केला. तसेच या काळात कुटुंब, वरिष्ठ, मित्र व मालेगाव वासियांनी दिलेला धीर आपल्यासाठी करोना मुक्तीचे औषधच ठरले हा आजार लपवणार नाही. तसेच याची जराही भीती बाळगू नका लक्षणे दिसताच योग्य उपचार घ्या. यामुळे स्वतःबरोबर कुटुंब व निकटवर्तीयांचे जीवाचे रक्षण होऊ शकेल अशी माहिती मनपा आयुक्त दीपक कासार यांनी दिली.

- Advertisement -

डॉक्टर, परिचारिका, पोलीस, आरोग्य व स्वच्छता सेवक यांच्यासह आम्ही कितीही प्रामाणिकपणे व जीव धोक्यात घालून परिश्रम घेतले तरी जनतेच्या सहकार्याशिवाय करोणाला हद्दपार करू शकत नाही. शहरात करोना चा पादुर्भाव रोखण्यासाठी मैदानात यंत्रणेसह उतरलेल्या मनपा आयुक्त दीपक कासार यांनाच 13 मे रोजी करोणाने बाधित केले.

मात्र, मैदानातून पळ काढणार नाही अशी गर्जना करत दुसऱ्या दिवसापासून आयुक्त कासार यांनी घरातूनच कामकाज सुरू ठेवत उपाय योजनांमध्ये कुठेही विस्कळीतपणा येणार नाही. याची दक्षता घेतली आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचे पालन केल्यामुळे त्यांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने अवघ्या आठ दिवसात आयुक्त कासार करोना मुक्त झाले.

मी करोना मुक्त झालो असलो तरी याचे विशेष समाधान नाही. संपूर्ण मालेगाव ज्या दिवशी करोणा मुक्त होईल, त्यादिवशी मला अत्यानंद होईल मालेगावकरांचे संकट दूर होणे. यातच आपला आनंद सामावलेला आहे. शहरात आज करोनाने उच्छाद  मांडला आहे.

सर्वांनी माझ्या प्रमाणे नियमाचे पालन केले व काळजी घेतली तर हे संकट निश्चितच संपुष्टात येणार आहे. पुरेशी काळजी घेतली नाही तर आपली बेफिकिरी आपल्या कुटुंबाच्या निकटवर्तीयांच्या व शेजाऱ्यांच्या जीवावर बेतू शकते ज्यांच्यासाठी आपण कष्ट करतो. अशा माणसांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी आपल्या सगळ्यांना काही दिवस काळजी घ्यावीच लागणार आहे.

त्रास व संभाव्य धोक्यापेक्षा सर्वांनी काळजी घ्यावी असे आव्हान आयुक्त कासारे यांनी केले आहे. या काळात पत्नीने प्रचंड मानसिक आधार दिला  तर दोघा मुलींनी मी बाधित आहे. याची जाणीवच होऊ दिली नाही. आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, यांनी सतत फोन करत प्रकृतीची विचारपूस केली व कामकाजाची माहिती घेतली मंत्रालय व नाशिक येथील अनेक वरिष्ठ आस्थेवाईकपणे चौकशी करत होते.

सर्वात विशेष म्हणजे मनपा अधिकारी व सेवकांनी दिलेल्या भरभक्कम साथीमुळे मानसिक आधार लाभून आपल्या काम करण्याचा उत्साह वाढला हे नाकारता येणार नाही. असे आयुक्त कासार यांनी सांगितल्या संकटावर मात करण्यासाठी आपण फक्त पंचसूत्रीचा अवलंब केला अशी माहिती देत आयुक्त कासार पुढे म्हणाले.

सकाळी अर्धा तास व्यायाम, अर्धा तास प्राणायाम, दोन वेळा शाकाहारी जेवण तसेच संत्री-मोसंबी अंजीर ही फळे खाल्ली डॉक्टरांनी दिलेली औषधे तसेच आयुर्वेदिक आयुष्य काढा घेतला दिवसभर गरम पाणी प्राशन केले विशेष म्हणजे सकारात्मक विचार ठेवत कामकाज केले. स्वतःचे कपडे व भांडी स्वतः घासली आपल्या संपर्कात घरातील कोणीही येणार नाही याची दक्षता घेतली.

या निर्णायक लढाईचे यश

अपयश जनतेच्या मदतीवर अवलंबून आहे. मालेगाव श्रमिक व कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची व व उद्योजकांची भूमी आहे. सर्वांनी एक दिलाने प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचे पालन करावे अशी विनंती आपण करत असल्याचे आयुक्त कासार यांनी शेवटी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या