VISUAL STORY : राज ठाकरेंच्या भाषणावर काय म्हणताय राज्यातील नेते?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा काल औरंगाबादमध्ये (Aurangabad) पार पडली. जवळपास एक तास केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी करत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. आता राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. जाणून घेऊयात काय म्हणताय राज्यातील नेते..

भोंगा हा कायद्याचा विषय आहे, हे प्रश्न कायद्यानेच सुटतील, कोर्ट, हायकोर्ट, पोलिस व्यवस्था यासंबंधित निर्णय घेतील. तुम्हाला आता काही काम नसल्यामुळे स्वत:च्या राजकीय हितासाठी तुम्ही हे विषय काढत आहात आणि देशातील वातावरण खराब करत आहात – संजय राऊत

राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्याविरुद्ध बोलल्याशिवाय राज यांना कव्हरेज मिळत नाही म्हणून ते टीका करतात. उद्या जर ते काँग्रेस किंवा अन्य कोणत्या पक्षावर बोलले तर लोकं त्यांना फार महत्व देणार नाहीत. म्हणूनच ते शरद पवारांवर टीका करतात. परंतू राज यांच्या विधानाला आता महाराष्ट्रातील लोकं किंमत देत नाही – जयंत पाटील

राज ठाकरे आज जनतेच्या प्रश्नावर बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. महाराष्ट्रात भोंग्याच्याबाबत सर्वत्र कारवाई झालेली आहे.म्हणून राज ठाकरेंच्या ४ तारखेच्या निर्वाणीच्या इशाऱ्याला अर्थ नाही. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा तमाशा बनवण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे, तो थांबवला पाहिजे – नाना पटोले

राज्यात भोंगे महत्वाचा विषय नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भोगें काढले तर तुमच्या देवाचे कार्यक्रमांचे काय? – दिलीप वळसे पाटील

राज ठाकरे चांगली वक्ते आहेत याबद्दल दुमत नाही. मात्र राज्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर राज ठाकरे रान का उठवत नाहीत. ज्यात सध्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांना वीज मिळत नाही पाणी आहे पण विजया भावी अडचणी येत आहेत भारनियमन होत आहे त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होण्याऐवजी भोंगे व हनुमान चालीसा यावरच प्रश्नावर चर्चा होऊ लागली आहे. राज्यात पूर्वी आर्थिक व इतर समस्यांवर चर्चा होत होत्या मात्र आता त्याला जातीयवळण दिले जात आहे – राजू शेट्टी

सभा सगळेच घेत असतात. आजही एक सुपारी सभा झाली. सुपारीच ती दुसरं काय? दुपारी उठायचं आणि सुपारी घ्यायची, दुसरं काय? कोणीतरी मध्यंतरी व्हॉट्स अपवर एक कार्टून पाठवलं होतं. त्यात असं चित्र होतं की एक बाई आपल्या मुलाला चपलेने फटकावते आणि म्हणते दुपारपर्यंत झोपून राहतोस आणि पहाटे पाचच्या भोंग्याची तक्रार करतोस – सुभाष देसाई


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *