महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निवडणूकीचा निकाल जाहिर

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा (Maharashtra University of Health Science) विविध प्राधिकरण मंडळाचा (Authority Board) निवडणूकीचा निकाल (Election results) जाहिर झाला आहे.

विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी निवडणुक निकाल (Election results) जाहिर केला. या निवडणुकीत विजयी उमेदवारांचे विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी अभिनंदन केले आहे.

विविध अभ्यासमंडळासाठी उशिरापर्यंत मतमोजणी प्रक्रिया (Vote counting process) सुरु होती. मुंबई विभागातून डेरे राजेश चंद्रकांत, पुणे विभागातून गायकवाड सायबू लक्ष्मण, नाशिक विभागातून भाबड प्रदीप रामराव, औरंगाबाद विभागातून बाळासाहेब पवार, अमरावती विभागातून उबरहंडे राजेश्वर व नागपूर विभागातून अभय दातारकर हे विजयी झाले आहेत.

या निवडणुकीत विद्यापरिषदेसाठी प्राचार्य गटात आयुर्वेद (Ayurveda) आणि युनानी विद्याशाखेतून माणिकराव कुलकर्णी बिनविरोध तसेच होमिओपॅथी (Homeopathy) विद्याशाखेतून पाथरीकर अनुपमा व्दारकादास व तत्सम विद्याशाखेतून ज्योती ठाकुर हे उमेदवार विजयी झाले आहेत. विद्यापीठाच्या अधिसभेसाठी प्राध्यापक वगळता शिक्षक गटात वैद्यकीय विद्याशाखेतून रविंद्र देवकर, दंत विद्याशाखेतून प्रशांत जाधव, होमिओपॅथी विद्याशाखेतून भालचंद्र ठाकरे व तत्सम विद्याशाखेतून विश्रांती ीगरी हे विजयी झाले आहे.

विद्यापीठ निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्या समवेत निवडणुक मतमोजणीच्या कामकाजासाठी सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री. बबनराव उधाणे, उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे, विशेष कार्य अधिकारी डॉ. दत्तात्रय कुटे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मा. उपकुलसचिव श्री. फुलचंद अग्रवाल आदी तज्ज्ञ व्यक्तींचा तसेच

उपकुलसचिव महेंद्र कोठावदे, डॉ. संजय नेरकर, डॉ. सुनिल फुगारे, अ‍ॅड. संदीप कुलकर्णी, श्री. अनंत सोनवणे, राजेंद्र नाकवे, संजय कापडणीस, संदीप राठोड यांचा समावेश होता. या कामकाजाकरीता अविनाश सोनवणे, रंजीता देशमुख, शैलजा देसाई, मोहन सोळशे, संजय सुराणा, आनंद जाधव यांनी परिश्रम घेतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *