Video : मी शपथ घेतो की…; ३९४ पोलीस उपनिरीक्षक सेवेत दाखल

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र पोलीस अकादमीत (Maharashtra Police Academy) प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांच्या १२० व्या तुकडीचा दीक्षांत संचलन (120 Batch Passing Out Parade) सोहळा सकाळी आठ वाजता झाला. अतिशय शिस्तबद्ध संचलन करत या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी उपस्थितांची मने जिंकली…

त्यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ, प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजय कुमार, अकादमीचे संचालक राजेश कुमार, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

१२० व्या तुकडीत २७८ पुरूष व ११६ महिला असे एकूण ३९४ प्रशिक्षण पूर्ण केलेले पोलीस उपनिरीक्षक आहेत. या संचलनाच्या पथकाच्या अग्रस्थांनी महिला प्रशिक्षणार्थी संध्याराणी देशमुख (Sandhyarani Deshmukh) यांनी नेतृत्व केले.

संध्याराणी देशमुख या संचलनाचे मुख्य कमांडर होत्या. तर सेकंड इन कमांडर शीतल टेम्भे (Shital Tembhe) या होत्या. निशाण टोळीने राष्ट्रध्वज आणि अकादमीच्या ध्वजाचे शानदार संचलन केले.

त्यानंतर अकादमीचे संचालक राजेश कुमार यांनी उपनिरीक्षकांना कर्तव्याची शपथ दिली. तर, आठ ट्रूप असलेल्या या संचलनात कंपनी कमांडर, प्लाटून कमांडर यांसह मार्कर यांच्या नेतृत्वात प्रशिक्षणार्थींनी दिमाखात संचलन करुन मान्यवरांना मानवंदना देत अधिकारी पदाने सेवेत ‘पहिले पाऊल’टाकले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *