Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ठप्प यंत्रणा पूर्वपदावर

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ठप्प यंत्रणा पूर्वपदावर

सातपूर । प्रतिनिधी

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची आठ दिवसांपासून बंद असलेली ‘सिंगल विंडो’ ही ऑनलाइन प्रणाली काल सुरू झाल्याने राज्यातील उद्योजकांची महत्त्वाची ठप्प झालेली कामे हळूहळू पूर्ववत सुरू झाली आहे.

- Advertisement -

एमआयडीसीच्या संगणक प्रणालीवर ‘रॅन्समवेअर’ या व्हायरसचा शिरकाव झाल्याने महत्त्वाची माहिती नामशेष होणार होती. मात्र सुदैवाने ही संपूर्ण माहिती क्लाऊड प्रणालीत आरक्षित असल्याने मोठ्या अडचणीतून सुटका झाल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा यांनी पत्राद्वारे सर्व उद्योजक संघटनांना कळविले आहे.

एमआयडीसीची बहुतांश कामे ऑनलाइन पध्दतीने केली जातात. त्यामुळे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर इ-मेलचा वापर केला जातो. यातूनच काही अपप्रवृत्तींनी इ-मेलमध्ये ‘रॅन्समवेअर’ व्हायरस पाठवून तो व्हायरस इ-मेल उघडताच यंत्रणेत पसरून सर्व डेटा करप्ट केल्याचे समजते. त्यामुळे राज्यभरातील एमआयडीसी कार्यालयातून सेवकांना संगणकावर ऑनलाइन कामकाज करण्यास मज्जाव करण्यात आला होता.

सिंगल विंडोचे कामकाजही या दरम्यान ठप्प असल्याने ऑफलाइन काम करण्यात येत होते. दरम्यान मागील आठ दिवसांपासून यावर बारकाईने काम करून नाशिकच्या इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन्स या कंपनीने त्यांच्या क्लाऊड प्रणालीमधून एमआयडीसीची महत्त्वपूर्ण माहिती पुन्हा उपलब्ध करून दिल्याचे समजते. याबाबत एमआयडीसीकडून अधिकृत कोणतेही उत्तर दिले गेलेले नाही.

इतर कामकाज टप्याटप्याने सुरू

धोका टळल्यानंतर एमआयडीसीने सिंगल विंडो सिस्टिम तातडीने सुरू केली. तर इतर काही सिस्टिम्सचा डाटा एमआयडीसीच्याच मुख्यालयातील डेटा सेंटरमध्ये आरक्षित करण्यात आला. या यंत्रणाही सायंकाळपासून कार्यरत झाल्या. एमआयडीसीची माहिती तंत्रज्ञान विभागाची टीम त्याकरिता दिवसरात्र काम करत होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या