Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उद्योगपती रतन टाटांची भेट; काय आहे कारण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उद्योगपती रतन टाटांची भेट; काय आहे कारण?

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

- Advertisement -

यावेळी रतन टाटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन केलं. तसंच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीत महाराष्ट्राच्या विकासाबद्दल विविद मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते.

रतन टाटा यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मागील सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिला जात असल्याने अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यासंबंधी विचारण्यात आलं.

त्यावर त्यांनी, जी कामं अगदी शेवटी, घाईत मंजूर केली त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. इतर अत्यावश्यक कामांना स्थगिती देण्यात आलेली नाही, असं सांगत अधिकारी नाराज असल्याचं वृत्त फेटाळलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या