Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra Assembly Budget Session : असल्या व्हिपला भीक घालत नाही; भास्कर जाधव...

Maharashtra Assembly Budget Session : असल्या व्हिपला भीक घालत नाही; भास्कर जाधव आक्रमक

मुंबई | Mumbai

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे. तत्पूर्वीच शिंदे गटाकडून शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे.

- Advertisement -

या ५५ आमदारांमध्ये आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यामुळे अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. मात्र असल्या व्हिपला मी भीक घालत नाही, असं आक्रमक विधान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे.

तुम्हाला माहिती आहे का? ‘स्वर्गदारा’तील तार्‍याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले आहे..

शेड्यूल १० या पक्षांतर्गत बंदी विरोधी कायद्याचं सरकारला भान आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कै. अटलबिहारी वाजपेयी यांनी हा कायदा आणला होता. बंडखोरांनी एखाद्या पक्षात सामील व्हावं किंवा नवीन पक्ष स्थापन करावा. व्हिपने कुणी घाबरवत असेल तर मी भीक घालत नाही. आमचं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमचं संरक्षण काढलं तरी आम्ही डगमगलो नाही तर व्हिपचं काय घेऊन बसलात, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या भावाचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

दरम्यान सुनील प्रभू म्हणाले, आम्हाला कोणालाही व्हीप प्राप्त झालेला नाही. आमच्या उपस्थितीबाबत ते व्हीप बजावू शकत नाही. मात्र आम्ही त्यांना व्हीप बजावू शकतो. ते असे करु शकत नाही. त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात व्हीप न बजावण्याचे मान्य केले होते. जर त्यांनी असे केले तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल, असा विश्वास सुनील प्रभू यांनी व्यक्त केला.

क्रूरतेच्या सर्व सीमा पार..! प्रेयसीला मेसेज केल्याने मित्राचीच केली हत्या; हृदय काढलं, गुप्तांग छाटलं अन् फोटो…

आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला मिळाल्यानं आधीच ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे शिंदे गटाने आम्ही व्हीप काढणार नसल्याचं न्यायालयात सांगितलं आहे. मात्र व्हीप काढण्यास तो शिवसेनेच्या सर्व आमदारांना लागू होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये ठाकरे गटाच्या आमदारांना देखील व्हीप मान्य करावा लागेल, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या