Friday, April 26, 2024
Homeजळगावशेतकर्‍यांप्रती महाविकास आघाडी सरकार उदासीन!

शेतकर्‍यांप्रती महाविकास आघाडी सरकार उदासीन!

जळगाव- jalgaon

अतिवृष्टीमुळे (Heavy rain) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान (Crop damage) झाले. प्रशासनाच्या माध्यमातून पंचनामे (Punchnama) करण्यात आले. राज्य सरकारने शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र आतापर्यंत दमडीही मिळाली नाही. त्यामुळे राज्य शासनाची (state government) शेतकर्‍यांप्रतीची भूमिका उदासीन (Indifferent) असल्याची टीका भाजप नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, राज्य सरकारच्या उदासिन भूमिकेच्या निषेधार्थ १ नोव्हेंबरला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

जळगावातील जी.एम. ङ्गाऊंडेशन संपर्क कार्यालयात ते बोलत होते. यावेळी आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिताताई वाघ, जि.प.अध्यक्षा ना.रंजना पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, नगरसेवक विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी आदी उपस्थित होते.

दमडीही न मिळाल्याने शेतकर्‍यांसाठी काळी दिवाळी

दीड वर्ष कोरोनामध्ये गेले. आजारपणात खर्च झाले. अनेकांचे रोजगार बुडाले. अशा स्थितीनंतर अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, केळी या पिकांचे नुकसान झाले. राज्य सरकारने नुकसान भरपाई म्हणून, मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र शेतकर्‍यांपर्यंत एक रुपयाचीही मदत दिली गेली नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी शेतकर्‍यांसाठी काळी दिवाळी ठरणार आहे. राज्य सरकारने केवळ ङ्गसव्या घोषणा केल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला.

शेतकरी उतरणार रस्त्यावर

शेतकरी संकटात सापडलेला आहे. मात्र, सरकारला त्याचे काहीही घेणे देणे नाही. अतिवृष्टीमुळे गेले तीन महिने कृषी पंपदेखील सुरु केले गेले नाही. असे असतांनाही शेतकर्‍यांना बीलं भरायला सांगतात. त्यामुळे शेतकर्‍यांचा सरकारवर रोष आहे. आणि त्यामुळेच दि. १ नोव्हेंबर रोजी सरकारच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरणार असल्याचे आमदार महाजन यांनी स्पष्ट केले.

ट्रान्सङ्गॉर्मर मिळत नसल्याने अनेक गावांमध्ये अंधार

राज्य सरकारने शेतकर्‍यांना मदत करायला पाहीजे. परंतू, सरकारची भूमिका उदासीन आहे. शेतकरी त्रस्त झालेला आहे. शेतकर्‍यांना ट्रान्सङ्गॉर्मर मिळत नाही त्यामुळे अनेक गावांमध्ये अंधार असतो. केवळ ही जिल्ह्यातीलच परिस्थिती नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती ओढावली आहे. बांधावर जावून मदत करु. अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मग, त्यांच्या घोषणेचे काय झाले? असा सवाल उपस्थित करत, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.


सरकारला आर्यन खानसाठी वेळ पण शेतकर्‍यांसाठी नाही

शेतकर्‍यांचे प्रश्‍न अधिक महत्वाचे आहेत, वीजेचा प्रश्‍न महत्वाचा आहे, इकडे शेतकरी मरतो, तरीदेखील त्याकडे राज्य सरकारला बघायला वेळ नाही. मात्र, ड्रग्स प्रकरणात संशयित असलेल्या आर्यन खानसाठी सरकारला वेळ आहे. असा पटलवार आमदार गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या