ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी महागाईचा भडका

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली | Delhi

ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सामान्यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. कारण दिवसागणिक वाढत चालेल्या इंधनदर वाढीसह आता पेट्रोलियम कंपन्यांनी सुद्धा त्यांची एलपीजी सिंलिंडरच्या दरात वाढ केली आहे.

गॅस सिलेंडरची किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. यावेळी ही वाढ १९ किलो कमर्शिअर सिंलेडरवर झाली आहे. आज १ ऑक्टोबरपासून दिल्लीमध्ये १९ किलोच्या कमर्शिअल सिलेंडरची किंमत १६९३ रुपयांपासून वाढून १७३०.५० रुपये इतकी झाली आहे.

कमर्शिअल सिलेंडरची किंमत ४३ रुपयांनी वाढली आहे. तर नॉनसबसिडीचे घरगुती सिलेंडरची किंमत ८८४.५० रुपये झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये झालेली वाढ पाहता LPG सिलेंडरची किंमत ९०० रुपयांपेक्षा जास्त वाढ होऊ शकते.

तसेच काही दिवस स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढू लागले आहे. पेट्रोलियम कंपन्याकंडून सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी २५ पैशांची वाढ झाली आहे.

मागील आठ दिवसात डिझेल १.५५ रुपयांनी तर पेट्रोल ७० पैशांनी महागले आहे. याआधी गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैशांची वाढ केली होती. तर बुधवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. मंगळवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवला होता.

दरम्यान, आजच्या दर वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर १०७.९५ रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी ९७.८४ रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०१.८९ आणि ९०.१७ रुपये इतका आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *