Friday, April 26, 2024
Homeनगरप्रेमप्रकरणातून श्रीरामपूरात गोळीबार

प्रेमप्रकरणातून श्रीरामपूरात गोळीबार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दुर्गानगर सुतगिरणी श्रीरामपूर (Durganagar Sutagirani Shrirampur) या परिसरात सोमवारी रात्रीच्या दरम्यान प्रेमप्रकरणातून (Love affair) पल्सर मोटारसायकलवरुन तरुणावर येवून पिस्टलने गोळीबार (Pistol firing) केला. याप्रकरणी तरुण जखमी (Youth Injured) झाला असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी (Shrirampur City Police) दोघाजणांविरुध्द गुन्हा दाखल करुन 12 तासाच्या आत या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक (accused were arrested) केली आहे.

- Advertisement -

गुरुवार दि. 26 जुलै 2021 रोजी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास दुर्गानगर सुतगिरणी श्रीरामपूर येथे शुभम राजु जवळकर (वय-23) यास शुभम यादव (रा.स्मशानभुमीजवळ श्रीरामपूर) याने त्याचे साथीदारासह लाल काळ्या रंगाचे पल्सर मोटारसायकलवरुन येवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टलने गोळी मारली होती. सदर गोळीबारात शुभम राजु जवळकर याच्या छातीवर गोलाकार जखम झाली होती. जखमी शुभम जवळकर यास उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुभम राजु जवळकर याचे एक मुली बरोबर ब्रेकअप (Breakup) झाल्यानंतर सदर मुली सोबत आरोपी शुभम यादव याचे प्रेम प्रकरण चालू होते. त्यामुळे सदर मुलीवरुन दोघामध्ये यापूर्वी वाद झालेले होते. त्याचा राग मनात धरुन शुभम यादव याने गोळीबार करुन शुभम जवळकरला जिवे मारण्याचा डाव आखला होता.

या घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक संजय सानप (PI Sanjay Sanap) व पोलीस पथक त्वरीत घटनास्थळी जावून गोपनिय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी शुभम राजकुमार यादव (वय 18) रा. स्मशानभुमीजवळ वार्ड नं. 6 श्रीरामपूर, मयुर दिपक तावर (वय 18) रा. अल्फा हॉस्पिटलमागे वार्ड नं. 3 श्रीरामपूर यांना अटक (Arrested) करण्यात आलेली असून सदर गुन्हयात वापरलेली पल्सर मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे. सदरचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे (Sub-Inspector of Police Dattatraya Uje) हे करित आहेत.

याप्रकरणी श्रीारमपूर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 505/2021 नुसार शुभम राजकुमार यादव, मुयर दिपक तावर या दोघांविरुध्द भादवि कलम 307, भा.ह.का.क.3/25 प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक़ मनोज पाटील (SP Manoj Patil), अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे (Dr. Deepali Kale), पोलीस उपअधीक्षक श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच संदीप मिटके (Sandip Mitke) यांचे सुचना प्रमाणे पोलीस निरीक्षक संजय सानप, सपोनि संभाजी पाटील, पोलीस उपनिरीक्ष दत्तात्रय उजे, पोना बिरप्पा करमल, पोकों किशोर जाधव पोकॉ राहुल नरवडे, पोकॉ पंकज गोसावी, पोकों रघुनाथ कारखेले, यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या