Saturday, May 11, 2024
Homeनाशिककांदा भिजल्याने लक्षावधींचे नुकसान; वीज कोसळून बैल ठार

कांदा भिजल्याने लक्षावधींचे नुकसान; वीज कोसळून बैल ठार

मुंजवाड । वार्ताहर | Munjwad

बागलाण तालुक्यातील (baglan taluka) मुंजवाड (munjwad) परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने वीज कोसळून आदिवासी शेतकर्‍याचा (farmer) बैल ठार झाला.

- Advertisement -

पावसाची आतुरतेने वाट पहाणार्‍या बळीराजा सुखावला असला तरी या पावसामुळे (monsoon) शेतकर्‍यांच्या कांदा पिकाचे (onion crop) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने काहीकाळ वाहतुकीची कोंडी (Traffic jam) झाली होती.

जून महिना संपत आला तरी बागलाण तालुक्यात (baglan taluka) पाऊस नसल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र, बुधवारी (दि. 23) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक पावसाचे वातावरण तयार होऊन जोरदार पाऊस सुरू झाल्याने मुंजवाड येथील शेतकरी राजेंद्र दगाजी जाधव यांच्या कांद्याच्या शेडमध्ये शेतातील पाणी शिरून चारशे क्विंटल कांदा (onion) वाहून गेला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान (Financial loss) झाले.

काही शेतकर्‍यांच्या कुडाच्या साध्या चाळींवरील प्लॅस्टीक कागद वादळामुळे उडून गेल्याने कांदा भिजला. दोन पैसे जादा भाव मिळण्याच्या आशेवर साठवलेला कांदा भिजल्याने शेतकर्‍यांना आता हा कांदा अल्प भावात विकावा लागणार असल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.

येथील आदिवासी शेतकरी कृष्णा उमाजी पिंपळसे यांचा मुलगा मुरलीधर झाडाखाली बांधलेला बैल सोडण्यासाठी जात असतांनाच अचानक वीज कोसल्याने (lightning strike) बैल जागीच ठार झाला तर मुरलीधर वीजेच्या धक्याने बेशुद्ध पडला होता. त्याला तात्काळ उचलून घरात आणले. केवळ दैव बलवत्तर म्हणून तो बालंबाल बचावला व थोड्या वेळाने शुद्धीवर आल्याने कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेचा महसूल व कृषी विभागाच्या प्रतिनीधींकडून पंचनामा करण्यात आला आहे.

पहिल्याच पावसात रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्यांतून मार्गक्रमण करणे जिकरीचे झाले होते. गतवर्षी कंधाणा फाटा ते खमताणे रस्त्यावरील मुंजवाड फाट्यावर मोरीचे काम करण्यात आले. मात्र, पाणी निघण्यासाठी योग्य काळजी न घेतल्यामुळे मंगलदास भिला जाधव यांच्या शेताजवळ पाणी तुंबून दोन दिवस या मार्गावरील वाहतूक बंद होती. या ठिकाणचे पाणी तात्काळ काढण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. तसेच मुंजवाड-मळगांव-सटाणा रस्त्यावरही सोसायटीचे चेअरमन कारभारी जाधव यांच्या घरासमोर पाणी तुंबत असल्याने दरवर्षी वाहनचालकांना कसरत करावी लागते.

अनेकदा वाहनचालकांमध्ये वादाचे प्रसंग या ठिकाणी उद्भवतात. बुधवारी झालेल्या पावसाबरोबर वादळ असल्याने खमताणे-तिळवण दरम्यान रस्त्यावर अनेक ठिकाणी वृक्ष कोसळल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक टप्प झाली होती. परिसरातील शेतकर्‍यांच्या मदतीने या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. पहिलाच पाऊस जोरदार झाल्याने अनेक ठिकाणी बांध फुटल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले. तथापी पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

लोहोणेरला दमदार हजेरी

मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर लोहोणेर परिसरात बुधवारी (दि. 22) पाच वाजेच्या सुमारास आद्रा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दुपारी अचानक पावसाला सुरवात झाली. या पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरी पेरणीपूर्व मशागतीसाठी अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. अचानक आलेल्या पावसाने सर्वसामान्य नागरिकांची मात्र धांदल उडाली.

काही काळ वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. पावसापेक्षा वादळच जोरदार असल्याने काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे रस्ते वाहतूक बाधित झाली होती. पावसासाठी खात्रीचे व पेरणीयोग्य असलेले मृग नक्षत्र यावर्षी कोरडे गेल्याने बळीराजा पावसाची वाट पहात नाराजी व्यक्त करीत होता. बुधवारच्या पावसामुळे मात्र शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले केले असून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या