Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशाळांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर !

शाळांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर !

नाशिक | Nashik

शाळांचे वर्ग सुरू करण्यासाठी सुरक्षेची जबाबदारी शाळा प्रशासनावर टाकण्यात आल्याने त्याला शाळांनी विरोध दर्शविला.

- Advertisement -

अखेर याची दखल घेत शिक्षण विभागाने नव्याने आदेश देत शाळांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपविली आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी शासकीय केंद्रात मोफत करण्याच्या सुचनाही विभागाने दिल्या आहेत.

राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना (एसआेपी) जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार शाळांमध्ये सॅनिटायझेशन, थर्मल गन, पल्स आँक्‍सिमीटर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शाळांवर टाकण्यात आली होती.

परंतु, यासाठीचा खर्च कोण करणार याबाबतही स्पष्ट सुचना नसल्याने मुख्याध्यापक संघटनांनी याला विरोध केला होता. अखेर शाळांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असल्याचे शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना काळात शाळांचे सॅनिटायझेशन, आरोग्य यंत्रणेची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असून शिक्षकांची कोरोना चाचणी शासकीय केंद्रात मोफत करण्यात येणार आहे.

शाळांमध्ये आरोग्यविषयक जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या दृष्टीने राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदांनी सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे. १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी मोफत करण्यात येणार आहे. ही चाचणी शासकीय केंद्रात मोफत करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या