खरीप हंगामासाठी २ हजार ३०० कोटींचे कर्ज वाटप

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

रब्बी हंगामात विक्रमी कर्ज वाटप केल्यानंतर जिल्हाप्रशासनाने आता रब्बी हंगामात २ हजार ३०० कोटींचे कर्ज वाटप केले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत ९५९ कोटी जादा कर्ज वाटप करण्यात आले आहे.गत चार वर्षातील हा खरीप पीक कर्ज वितरणाचा उच्चांक असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात २०२१ -२२ आर्थिक वर्षासाठीचा पतपुरवठा नियोजनाची बॅंक अधिकार्‍यांसोबत बैठक झाली. यावेळी जिल्हा लीड बँक व्यवस्थापक अर्धेंदू शेखर, एसबीआय बॅकेंचे क्षेत्रिय सहायक महाप्रबंधक सफल त्रिपाठी, जिल्हा उपनिबंधक सतिश खरे, एनडीडीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश पिंगळे यांच्यासह इतर बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, यात मागील चार वर्षांचा शेती कर्जांचा आढावा घेतला असता २८ फेब्रुवारी २०२१पर्यंत जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत ९५९ कोटी रुपयांनी अधिक पीक कर्ज वितरण झाले आहे. जिल्ह्यात पीक कर्ज वितरणात वाढ झाली असली तरी जिल्ह्यात शेतीची मुबलक कामे असल्याने त्यात वाढीची शक्यता अधिक आहे.

तसेच शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड वेळेवर करून किंवा नूतनीकरण करून व्याज परताव्याचा लाभ घ्यावा, ज्यामुळे जिल्ह्यातील पतपुरवठ्यास चालना मिळेल व जिल्ह्यातील शेती उद्योगातील प्रगतीत सर्वसमावेशक वाढ होईल. बॅंकांनीही एक वास्तववादी लक्ष्य निश्चित करावे.

जे जिल्ह्याची पीक कर्जाची आवश्यकता तसेच बँकांना दिलेल्या उद्दिष्टांना प्रतिबिंबीत करेल आणि येणाऱ्या आर्थिक वर्ष २०२१-२०२२ साठी सूक्ष्म विश्लेषण करण्यासाठी ते प्रभावी ठरेल. हे उद्दिष्ट हे शाखांची संख्या, प्रसार आणि गतिशीलता, लागवडीखालील जमीन आणि पिकाच्या उत्पादनास चालना देणारे व शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानासीठी प्रेरित करणारे असावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *