Thursday, April 25, 2024
Homeनगरपशुधनाच्या आरोग्यासोबतच पाण्याची गुणवत्ता व रक्ततपासणी गरजेची- निर्मळ

पशुधनाच्या आरोग्यासोबतच पाण्याची गुणवत्ता व रक्ततपासणी गरजेची- निर्मळ

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गाई व म्हशींसाठी पशुखाद्य महत्त्वाचे आहे. संतुलित व सकस चारा जितका महत्त्वाचा आहे तितकेच पिण्याचे पाणी देखील असणे गरजेचे आहे. पशुधनाची रक्त तपासणी केल्यामुळे त्यांच्या रक्तातील कॅल्शियम, फॉस्परस, मॅग्नेशियम यांचे प्रमाण लक्षात येत असल्याने पशुंची रक्त तपासणी महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन निर्मळ टी. एम आरचे संस्थापक सारंगधर निर्मळ यांनी केले.

- Advertisement -

श्रीरामपूर एमआयडीसी लगत दिघी परिसरात असलेल्या निर्मळ टी. एम. आर प्रकल्पाला कोपरगाव येथील गुरुकृपा डीस्ट्रीब्युटर्सचे संचालक सतीश दवंगे यांनी भेट दिली. त्यांनी तेथील प्रकल्पातील कालवडींना पिण्याच्या पाण्यासाठी सॉफ्टनर्स बसवून दिला. त्यावेळी निर्मळ बोलत होते.

श्री. निर्मळ म्हणाले, समोर येऊ घातलेल्या उन्हाळ्यामुळे शेतकर्‍यांच्या विहिरीतील पाण्यात व बोअरमधील पाण्यात हार्डनेसची (टीडीएस) मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून प्रत्येक दूध उत्पादकांनी गोठ्यातील गाईंच्या संख्येनुसार छोट्या आकाराचे व परवडणारे वॉटर सॉफ्टनर्स संयंत्र बसवून घ्यावे. निर्मळ टीएमआरद्वारे काही गोठ्यांमधील गायींची रक्त तपासणी केली असता काही गाईंना संसर्गजन्य ब्रुसोलीसीस रोगाची लागण झाल्याचे आढळले तसेच काही गाईंना गोचीड ताप आलेला आढळला. त्यामुळे गोठ्यातील गायांची रक्त तपासणी करून घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

दोन वर्षांपासून परिसरातील अनेक गावांमध्ये निर्मळ टीएमआरचे यशस्वीरित्या दररोज वितरण सुरू असून टीएमआर (गाईंचा संतुलित आहार) विकत घेणार्‍या शेतकर्‍यांचे डेअरी फार्म्सचा कायापालट झाला असून सध्या टीएमआर प्रकल्पाचे विस्तारीकरण सुरू आहे. दूध उत्पादकांंचे कष्ट वाचावेत आणि गोठा नफ्यात यावा, यासाठी दूध उत्पादकांनी प्रकल्प अधिकारी चेतन ढोकचौळे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन निर्मळ यांनी केले.श्री. दवंगे यांनी, पिण्याच्या पाण्याच्या सॉफटनर्समुळे गाईंच्या पचनक्षमतेत सुधारणा होते, दुग्धोत्पादनात वाढ होते, गाई वेळेवर माजावर येऊन गाभण राहतात व गाईंचे आरोग्य सदृढ होते, असे सांगितले.

याप्रसंगी डॉ. निलेश खाडे, गुरुकृपा डीस्ट्रीब्युटर्सचे तेजस दवंगे, चेतन ढोकचौळे, जयश्री पांडे, भाऊसाहेब आहेर, विक्रांत उंडे, महेश बारहाते, अरुण मुठे, भारत चौधरी तसेच निर्मळ टीएमआर व कालवड संगोपन प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या