ताणविरहित आयुष्य जगा

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

एकविसाच्या शतकात महिला आपल्याला सर्वच क्षेत्रात आपले प्रभुत्व गाजवताना दिसत आहे. पूर्वीच्या काळी चुलीवर बसणारी महिला (women) आज थेट अंतराळात (space) जाऊन आपले अस्तित्व सिद्ध करू शकली आहे.

महिलेच्या या सक्षमतेमुळे समाज देखील घडताना आपण बघत आहोत. एक स्त्री शिकली तर समाजबांधणी मध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो. सध्याच्या ताणतणावरहित जीवनात महिलांना आपले आरोग्य सुदृढ (Good Health) राखणे देखील आवश्यक ठरते तसेच ताणविरहित जीवनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. आज महिला या पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून काम करत आहे.

यामध्ये पोलीस विभाग (Police Department) असो, महसूल (Revenue) असो किंवा सध्याच्या माहिती तंत्रज्ञान विभाग (Department of Information Technology) असो या प्रत्येक विभागात महिला आपला दर्जा टिकवून आहेत. या सर्व क्षेत्रात महिलांचा कामाची पद्धत बघता त्यांना पचनाचे विकारासोबतच इतर आजार उद्भवण्याची शक्यता असते.

वेळेवर जेवण नसणे, पुरेशी झोप नसणे तसेच अनेक बाबीमुळे त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रामुख्याने मानसिक तणाव (Mental stress) वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे डोकेदुखी, अंगदुखी, हार्मोन्समध्ये अनियमितता येणे यांसारखे आजार सातत्याने वाढत असतात.

महिलांना फक्त बाहेर काम करण्यासोबतच घरातील कामे देखील बघणे क्रमप्राप्त ठरत असते. त्यामुळे एकाच वेळी अनेक बाबींवर कामे करताना त्यांना आपले आरोग्य सुदृढ ठेवणे देखील आवश्यक असते. यासाठी दैनंदिन जीवनात आपली दिनचर्या व्यवस्थित राखणे आवश्यक आहे. दैनंदिन आयुष्यात जगताना योगा, प्राणायाम तसेच वेळोवेळी उपचार घेणे आवश्यक असते. शारीरिक तसेच मानसिक शांतता टिकविण्यासाठी घरात तसेच काम करण्याच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण, खेळीमेळीचे वातावरण टिकविणे गरजेचे आहे.

दैनंदिन जीवनात आहार, विहार, दिनचर्या यांचे सुव्यवस्थापन असणे आवश्यक असते. घराच्या कामाच्या वेळा नियमित ठेवून आहार घेणे आवश्यक ठरते. आरोग्याच्या तक्रारी वाटत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे देखील आवश्यक ठरत असते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *