Friday, April 26, 2024
Homeनाशिकअनुदानासाठी बँक खात्याला आधार जोडणी बंधनकारक

अनुदानासाठी बँक खात्याला आधार जोडणी बंधनकारक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शासनाकडून करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना देण्यात येणारे सानुदान (Grants heirs of those who died due to corona) वारसांच्या खात्यास आधार लिंक ( Aadhar Card )असेल तर त्या आधारावरच मिळत आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या आणि अर्ज करत असलेल्या वारसांनी त्वरित आपले बँक खाते आधार क्रमांकसोबत अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे( District Disaster Management Cell )करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, मृतांना देण्यात येणार्‍या अनुदानाबाबत सचिवांनी आढावा घेतला असता या बाबी प्रकर्षाने समोर आल्याने आधार क्रमांकाद्वारेच अनुदान वितरीत करावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. आढाव्यात अनेक अर्जदारांच्या आलेल्या अर्जांमध्ये बँक खाते अन् इतर बाबींची माहिती चुकीची किंवा अपूर्ण भरलेली, खाते नंबर लिहिताना त्यात टायपिंग मिस्टेकही झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे दिसून आले. परिणामी मदत मिळण्यास अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले. यावर मार्ग काढण्यासाठी सचिवांनी आदेश दिले होते.

वारसांच्या आधार नंबरला लिंक असलेल्या खात्यात शासकीय यंणत्रेकडून लागलीच मदत वितरीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे करोना मृतांच्या वारसांना शासनाकडून मिळणार्‍या 50 हजारांचे सानुग्रह अनुदानासाठी आपले बँक खात्यास त्वरित आधार जोडणी ( Link Aadhar Card to Bank Account for Grants )करावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या