Friday, April 26, 2024
Homeजळगावमुकूंद नगरातील घरावर कोसळली वीज

मुकूंद नगरातील घरावर कोसळली वीज

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरातील मुकूंद नगरात रविवारी पहाटे वादळी वार्‍यासह झालेल्या पावसात वीज पडल्याची घटना उघडकीस आली. यामध्ये घराच्या जिन्याजवळील भाग तुटून पडला असून घरातील इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जळल्याने त्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती रामविलास इंगळे यांनी दिली.

- Advertisement -

रविवारी पहाटेच्या सुमारास शहरात विजांच्या कडकाडाट व वादळीवार्‍यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे तास दोन तास चालेल्या मुसाळधार पावसात विजांच्या प्रचंड कडकडाट सुरु होता. याचदरम्यान शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरातील मुकूंद नगरात रामविलास इंगळे आपल्या कुटुंबासह गाढ झोपेत असतांना त्यांच्या घरावर वीज कोसळली. यात त्यांच्या घराच्या जिन्यावरील काही भाग तुटून पडला असून भितींना तडा गेला आहे. तसेच घरातील इनव्हर्टर, पंखे यासह ट्युबलाईट देखील जळून खाक झाले असून त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वीज पडल्याच्या घटनेमुळे कुटुंब भेदारले

घरावर पहाटे पावणे चार ते चार वाजेच्या सुमारास वीज पडल्याने घराला हादरा बसला. यात इंगळे कुटुंबियांना जाग आली दरम्यान त्यांचे कुटुंब या घटनेमुळे प्रचंड भेदारलेल्या अवस्थेत होते. त्यांच्या घराच्या गॅलरीमध्ये स्लॅबचा तुटलेल्या विटांचा खच पडलेला होता. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नसल्याचे इंगळे यांनी सांगितले.

विद्युत यंत्रणा जळाली

घरावर वीज पडल्याची घटना घडताच घरातील चिमुकले प्रचंड घाबरुन गेली होती. त्यातच इंगळे यांचा मुलगा यामुळे सून्न झाला होता. यातच घरातील संपुर्ण विद्युत यंत्रणा बंद पडल्याने संपुर्ण अंधार पसरलेला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या